लंम्पी'' परावृत्तीसाठी 3100 जनावरांना लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लंम्पी'' परावृत्तीसाठी 3100 जनावरांना लसीकरण
लंम्पी'' परावृत्तीसाठी 3100 जनावरांना लसीकरण

लंम्पी'' परावृत्तीसाठी 3100 जनावरांना लसीकरण

sakal_logo
By

‘लंम्पी’ परावृत्तीसाठी 3100 जनावरांना लसीकरण ः डॉ. पठाण
कोल्हापूर, ता. ५ : लंम्पी स्कीन आजार गायींमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. हा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. जिल्ह्यात अतिग्रेत (ता. हातकणंगले) यत रोगाची लागण दिसली आहे. अतिग्रेपासून पाच किलोमीटर परिसरात असणाऱ्या गावांमधील जनावरांना लसीकरण केले जात आहे. आत्तापर्यंत 3100 जनावरांना लस दिली आहे. दरम्यान, या आजाराबाबत शेतकऱ्यांना घरपोच मोफत उपचार दिली जाणार आहे. तरीही, शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घ्यावी. जनावरांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी गोचिड, गोमाशी, डास यापासून परावृत्त करण्यासाठी औषध दिली जात असल्याचे निवेदन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. एम. पठाण यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गुजरात राज्यातून एका पुशपालकाने बाधित गाय खरेदी करुन आणली आहे. त्यामुळे जिल्ह्यात हा रोग बळावत आहे. ज्या ठिकाणी बाधित गाय आहे. त्या ठिकाण्याच्या सर्व जनावरांवर औषध फवारणी तसेच उपचार केले आहेत. लंम्पी आजार झालेली जनावरेही औषधोपचारामुळे बरी होत आहेत. बाधित जनावरे पूर्णपणे बरी होत असून जिल्ह्यातील लंम्पी आजारापासून एकीही पशुधन मृत झालेले नाही. लंम्पी आजारावर गुणकारी गोटपॉक्‍स वॅक्‍सिनचा पूरेपुर साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93572 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..