जिल्हा बँकेकडून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा  बँकेकडून
जिल्हा बँकेकडून

जिल्हा बँकेकडून

sakal_logo
By

48014


मध्यम, लघु उद्योगांनाही कर्ज 
आमदार हसन मुश्रीफ; जिल्हा सहकारी बँकेचे आणखी एक पाऊल
कोल्हापूर, ता. ५ : जिल्हा बँक शेतीसह साखर कारखाने व सूतगिरण्या या मोठ्या उद्योगांना अर्थपुरवठा करीत आहे. या पारंपरिक कर्ज पुरवठ्याबरोबर बँकेने मध्यम व लघु उद्योगांनाही भरीव अर्थपुरवठा करण्याची धोरण स्वीकारल्याची माहिती, बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिरोळच्या पद्मजा पॅकेजिंग या उद्योगाला ३७ कोटी कर्जाचे मंजुरीपत्र दिले. आमदार श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुंजीर, संचालक हेमंत देसाई, संचालक अमर देसाई यांनी ते स्वीकारले. कंपनीमध्ये मोठ्या आकारातील कोरोगेटेड बोर्ड,  बॉक्स, कार्टून, घडीचे बॉक्स यांचे उत्पादन केले जाते. दररोज १२० टन उत्पादनक्षमता असलेल्या या उद्योगातून देशासह परदेशातही निर्यात केली जाते.
श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘रिझर्व बॅंकेने नागरी सहकारी बँकांनी एकूण कर्ज पुरवठ्याच्या ५० टक्के कर्ज २५ लाखपर्यंत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जास्त मागणी असणारे कर्जदार जिल्हा बँकेकडे सरळ अथवा सहभाग योजनेअंतर्गत कर्जासाठी संपर्क करतात. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात स्थापन झालेल्या औद्योगिक वसाहतीत जागा घेऊन लघु व मध्यम प्रकल्प उभा करतात. त्यासाठी जिल्ह्यामध्ये कमी दरात पुरेसे व वेळेत अर्थसहाय्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे.’’
आमदार डॉ. राजेंद्र पाटील -यड्रावकर, आमदार राजेश पाटील,  ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने,  रणवीरसिंग गायकवाड,  सौ. स्मिता गवळी आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते. तसेच; बिगर शेती कर्जे व लवाद विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, अकाउंट बँकिंग विभागाचे व्यवस्थापक विकास जगताप, शेती कर्जे विभागाचे व्यवस्थापक चंद्रकांत रावण, व्यक्तिगत कर्जे विभागाचे व्यवस्थापक एस. के. बावधनकर आदी अधिकारी उपस्थित होते.       

कारखाने व उद्योगांना बळ
उद्योग व कारखाने चांगले चालत असताना व बँक पातळीवर चांगली पत, क्षमता असतानाही त्यांना कमी व्याजदरात पुरेसा व वेळेत कर्ज पुरवठा होणे महत्त्वाचे आहे.निर्यातक्षम उद्योग, परदेशी शिक्षण, स्वयंरोजगार, शासन अनुदानाच्या योजना अशा अनेक योजनातून जिल्हा बँकेच्या माध्यमातून थेट व संस्थामार्फत अर्थसाह्य दिले जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93593 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..