‘केवायसी’साठी शेतकऱ्यांची धांदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘केवायसी’साठी शेतकऱ्यांची धांदल
‘केवायसी’साठी शेतकऱ्यांची धांदल

‘केवायसी’साठी शेतकऱ्यांची धांदल

sakal_logo
By

48057
गडहिंग्लज : महसूल भवनमध्ये पी. एम. किसान लाभार्थी केवायसी अपडेटच्या कामात सुटीच्या दिवशीही महसूलची यंत्रणा कायम राहिली होती.

‘केवायसी’साठी शेतकऱ्यांची धांदल
पी. एम. किसान योजना; सुटीतही महसूलचे युद्धपातळीवर काम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : पी. एम. किसान योजनेतील लाभार्थींची ऑनलाईन केवायसी अपडेट करण्याच्या कामात महसूल विभागाची धांदल उडाली आहे. बुधवारअखेरची (ता. ७) त्यासाठीची मुदत आहे. यामुळे गणेशोत्सवात सलग तीन दिवस सुटी असतानाही सर्व महसूल कर्मचारी या कामात युद्धपातळीवर स्वत:ला गुंतवले आहे.
गेले तीन दिवस सुटीच्या कालावधीतही महसूल भवनमध्ये प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी, तलाठी, महसूल लिपिक या कामात आहेत. काही दिवसांपासून पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्याची दुरुस्तीची कामे रखडली होती. ही कामे कृषी विभागाने करावे की महसूल विभागाने या वादात दुरुस्ती, केवायसी अपडेट रखडली होती.
केवायसी असेल तरच लाभार्थींना अनुदानाचा पुढील हप्ता मिळणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात याची जागृती करून स्वत: महसूल विभागाने आता आघाडी घेतली आहे. त्यातच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारअखेर हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर महसूल विभागाची सारी यंत्रणा युद्धपातळीवर या कामात गुंतली आहे. तीन दिवसांत ऐंशी टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित लाभार्थींची केवायसी अपडेट करण्याचे काम जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांनीही तातडीने कागदपत्रे सादर करून केवायसी अपडेटसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा मुदत संपल्यानंतर केवायसी अपडेट होणार नसून यामुळे पी. एम. किसानचे अनुदानापासून वंचित राहावे लागेल, असा इशाराही दिला आहे.

चौकट...
शेवटचा दिवस उद्या
पी. एम. किसान योजनेचे गडहिंग्लज तालुक्यात ५० हजार लाभार्थी आहेत. आतापर्यंत ३४ हजार ५०० लाभार्थींचे केवायसी अपडेट पूर्ण झाली आहे. बुधवारी (ता. ७) केवायसी अपडेट करण्याचा शेवटचा दिवस आहे. यामुळे उर्वरित १५ हजार ५०० लाभार्थींनी तत्काळ केवायसी अपडेट पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार दिनेश पारगे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93657 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..