यीन तर्फे पर्यावरण पुरक गणेश विसर्जन उपक्रमाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यीन तर्फे पर्यावरण पुरक गणेश विसर्जन उपक्रमाचे आयोजन
यीन तर्फे पर्यावरण पुरक गणेश विसर्जन उपक्रमाचे आयोजन

यीन तर्फे पर्यावरण पुरक गणेश विसर्जन उपक्रमाचे आयोजन

sakal_logo
By

48167
-
यीनचा लोगो

‘यीन’तर्फे २०० मूर्तींचे
पर्यावरणपूरक विसर्जन

कोल्हापूर, ता. ५ ः सकाळच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यीन) आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रम झाला. यासाठी शाहू मिलसमोर विसर्जन कुंड ठेवले होते. त्यात विसर्जीत झालेल्या गणेशमूर्ती महापालिकेकडे सुपूर्द केल्या. सुमारे २०० मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करून त्या प्रशासनाला दिल्या. या उपक्रमाला महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे आणि सकाळ माध्यम समुहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी भेट दिली.
यीन सदस्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाविक मूर्ती विसर्जन कुंडात बुडवून ती यीन सदस्यांकडे देत होते. त्यानंतर तेथे उभ्या असणाऱ्या महापालिकेच्या ट्रॅक्टर आणि ट्रकमध्ये मूर्ती ठेवल्या जात होत्या. निर्माल्य संकलनाची व्यवस्था अवनी संस्थेने केली होती. सकाळ माध्यम समुहाचे संचालक संपादक श्रीराम पवार, प्रशासक डॉ. बलकवडे यांनी यीन सदस्यांशी संवाद साधला. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या विभाग प्रमूख डॉ.असावरी जाधव, चेतन भोसले प्रमूख उपस्थित होते. पार्थ देसाई, साक्षी पाटील, ऋतुजा पाटील, शिवानी शिंदे, तानिया मुरसल, निखिल जाधव, ओंकार रसाळ, ओंकार साठे, मुग्धा कुलकर्णी, रोहन शारबिद्रे, चित्रेश नांगरे, चेतना पाटील, साक्षी मरकड, ऋतुजा पाटील, श्रेया जाधव, साक्षी शेवाळे, सायली कांबळे, श्रेया चौगुले, सार्थक कोळेकर, सिया शेटे, शिवानंद पोळ, श्रावणी दास, आदित्य आडे, रोहन भट यांनी सहभाग घेतला होता. ज्ञानेश्वर शिंदे, सई साळोखे, विक्रमसिंह येडगे यांनी हा उपक्रम पर्यावरण संवर्धन चळवळीस बळ देणारा असल्याचे सांगितले. यीन सहाय्यक व्यवस्थापक अवधूत गायकवाड यांनी नियोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93684 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..