पेन्‍शनसाठी अंगणवाडी कर्मचारी करणार रास्‍ता रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेन्‍शनसाठी अंगणवाडी कर्मचारी करणार रास्‍ता रोको
पेन्‍शनसाठी अंगणवाडी कर्मचारी करणार रास्‍ता रोको

पेन्‍शनसाठी अंगणवाडी कर्मचारी करणार रास्‍ता रोको

sakal_logo
By

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा
जिल्ह्यात रास्‍ता रोको
वेतन व पेन्‍शनसाठी आक्रमक पवित्रा
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ५ : जिल्‍ह्यातील अंगणवाडी कर्मचारी पेन्‍शन, वेतनासाठी १० सप्‍टेंबरला ठिकठिकाणी आंदोलन करणार आहेत. इचलकरंजी, गडहिंग्‍लज व बांबवडे येथे १० सप्‍टेंबर, कोल्‍हापूर व कळे येथे १७ तर मुधाळतिठ्ठा येथे २४ तारखेला आंदोलन केले जाणार आहे. याबाबतचे पत्रक जिल्‍हा अंगणवाडी कर्मचारी संघाने प्रसिद्धीस दिले आहे. संघटनेने महिला बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी पत्रव्यवहार करून प्रश्‍‍न तातडीने सोडवण्याची मागणी केल्याचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी पत्रकात म्‍हटले आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचारी असल्याचे सरकारचे म्‍हणणे आहे. सर्वोच्‍च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचारी वेतनी कर्मचारी असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्याचे वेतन निर्धारित करणे व त्यांना महागाई भत्ता लागू करणे महत्त्‍वाचे आहे. अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर जगण्याचे कोणतेच साधन नाही. त्यामुळे कृती समितीने पेन्‍शनबाबत जी अभ्यासपूर्ण योजना मांडली आहे ती लागू करावी, निवृत्तीवेळी दिला जाणारा एकरकमी लाभ तातडीने द्यावा, आदी मागण्या केल्या आहेत. मागण्यांसाठीच जिल्‍ह्यात तीन दिवस आंदोलन केले जाणार असल्याचे पत्रकात म्‍हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93702 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..