जाहिरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात बातमी
जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

sakal_logo
By

48142

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे ‘महालोन कार्निवल’
कोल्हापूर, ता. ५ ः बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या कोल्हापूर अंचल कार्यालयामार्फत ‘महालोन कार्निव्हल’चे आयोजन केले होते. व्ही. टी. पाटील स्मृती भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. साई सर्व्हिसेसचे सहाय्यक महाप्रबंधक राजू पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कोल्हापूर अंचल कार्यालयाचे अंचल प्रबंधक अभिनव काळे यांनी ग्राहकांना बॅंकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती दिली. सणांच्या या महिन्यामध्ये बॅंकेने ग्राहकांमध्ये आनंद आणि उत्साह द्विगुणीत करण्यासाठी गृह, वाहन व तीन लाखापर्यंतच्या सोने तारण कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केल्याची माहिती ग्राहकांना दिली.
सदर सवलत ठराविक कालावधीपर्यंत मर्यादित असल्याने ग्राहकांनी जास्तीत जास्त सवलतीचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. कोल्हापूर अंचलचे उपअंचल प्रबंधक मुकुंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहरामधील सर्व शाखा प्रबंधक यांनी मेळाव्याचे नियोजन केले आहे. ताराराणी विद्यापीठ शाखेच्या शाखा प्रबंधक अनुराधा उरणकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93712 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..