आरोग्य विभागाच्या भरतीला मुहूर्त मिळाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य विभागाच्या भरतीला मुहूर्त मिळाला
आरोग्य विभागाच्या भरतीला मुहूर्त मिळाला

आरोग्य विभागाच्या भरतीला मुहूर्त मिळाला

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

आरोग्य विभागाच्या भरतीला मुहूर्त
१५, १६ ऑक्‍टोबरला परीक्षा; जिल्हा निवड मंडळातर्फे कार्यवाही
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ५ : शासनाच्या मार्च २०१९ च्या महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाकडील जिल्‍हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गाच्या पदभरतीसाठी लाखो अर्ज आले होते. मात्र, भरती झाली नव्‍हती. अखेर शासनाने १० मे २०२२ ला या भरतीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. त्यानुसार जिल्‍हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्‍त पदे यापुढे सर्व जिल्‍हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्‍हा निवड मंडळामार्फत भरण्यास मान्यता दिली आहे. त्याचाच एक भाग असलेली आरोग्य विभागाची भरती येत्या १५ व १६ ऑक्‍टोबरला होणार आहे. याबाबतचे आदेश शासनाकडून नुकतेच दिले आहेत.
शासनाच्या आदेशानुसार आता आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील रिक्‍त पदे भरण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार भरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये बिंदू नामावलीपासून ते परीक्षार्थींना त्यांचे प्रवेशपत्र उपलब्‍ध करून देण्यापर्यंत सर्व नियोजन केले आहे.

भरतीचा कालबद्ध कार्यक्रम
कालबद्ध कार्यक्रम कालावधी तारीख
बिंदू नामावली अंतिम करणे २ आठवडे २७ ऑगस्‍ट ते ८ सप्‍टेंबर
विभाग स्‍तर कंपनी निवड १६ सप्‍टेंबर अखेर
डेटा हस्‍तांतरण करून घेणे १ आठवडा १७ ते २२ सप्‍टेंबर
पात्र उमेदवार संख्या कळवणे १ आठवडा २३ ते २७ सप्‍टेंबर
परीक्षा नियोजनाची कार्यवाही १ आठवडा २८ सप्‍टेंबर ते ४ ऑक्‍टोबर
प्रवेशपत्र उपलब्‍ध करून देणे ५ दिवस ५ ते १० ऑक्‍टोबर
पाच संवर्गाच्या परीक्षेचे आयोजन १५ व १६ ऑक्‍टोबर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93727 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..