वाहतूक मार्गात बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक मार्गात बदल
वाहतूक मार्गात बदल

वाहतूक मार्गात बदल

sakal_logo
By

देखाव्यासाठी वाहतूक मार्गात बदल
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पार्किंगची सुविधाही उपलब्ध

कोल्हापूर, ता. ५ ः देखावे पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीचे आणि संभाव्य कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वाहतुकीसाठी बंद व खुले करणेत आलेले मार्ग
* बिनखांबी गणेश मंदिर ते निवृत्ती चौकाकडे जाणा-या सर्व मोटार वाहनांना बिनखांबी गणेश मंदिर येथे प्रवेश बंदी करण्यात आली.
*गांधी मैदान ते खरी कॉर्नर जाणाऱ्या सर्व चारचाकी गांधी मैदान मुख्यप्रवेशद्वारापासून महाराष्ट्र हायस्कूल मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
*खरी कॉर्नर मार्गे नाथागोळे तालीमकडे चारचाकी वाहने गांधी मैदान मार्गे पुढे सोडण्यात येतील.
*तटाकडील तालीम, सरस्वती टॉकीज, उभा मारुती चौकाकडून निवृत्ती चौकाकडे येणारी सर्व वाहने बिनखांबी गणेश मंदिर किंवा गांधी मैदान मार्गे पुढे सोयीनुसार पुढे सोडण्यात येतील.
*कळंबा- नवीन वाशी नाका मार्गे येणारी व जाणारी सर्व अवजड वाहने नवीन वाशी नाका ते साई मंदिर कळंबा, इंदिरा सागर हॉल चौक, रिंगरोड मार्गे सायबर चौकातून पुढे जातील.
*गगनबावडा मार्गे येणारी व जाणारी सर्व अवजड वाहने फुलेवाडी रिंगरोड, आपटेनगर चौक, नवीन वाशी नाका, साई मंदिर कळंबा, इंदिरा सागर हॉल चौक, रिंगरोड मार्गे, सायबर चौक, हायवे कॅन्टीन चौक ते रेल्वे उड्डाणपूल अशी सोयीनुसार मार्गस्थ होतील.
*इंदिरा सागर हॉलकडून मिरजकर तिकटीकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने नंगीवली तालीम चौक येथून स.म. लोहिया हायस्कूल, खरी कॉर्नर ते बिनखांबी गणेश मंदीर मार्गे पुढे जातील.
*शहरातून रत्नागिरी- पन्हाळ्याकडे जाणारी व येणारी सर्व अवजड वाहने ताराराणी चौक, धैर्यप्रसाद चौक, पोस्ट ऑफिस चौक, महावीर कॉलेज चौक सीपीआर चौक मार्गे ये-जा करतील.
*कसबा बावडा मार्गे शहरात येणारी सर्व प्रकारची जड, अवजड वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरुन तावडे हॉटेल, शिरोली टोल नाका, ताराराणी पुतळा मार्गे सोडण्यात येईल. अन्य वाहने पिंजार गल्ली, जयभवानी चौक, रेणुका मंदिर मार्गे पुढे मार्गस्थ होतील.

पार्किंग सुविधा
*बिंदू चौक मनपा पार्किंग
*प्राथमिक शाळा क्र. ९ राजारामपूरी
*मेन राजाराम हायस्कूलचे मैदान
*शिवाजी स्टेडियम
*पेटाळा हायस्कूल
*व्ही. टी. पाटील भवन
*शहाजी लॉ कॉलेजचे बाजूच्या बँक समोर
*शाहू मिल समोरील रिकामी जागा
*दसरा चौक
*शहाजी लॉ कॉलेजचे मैदान
*प्रायव्हेट हायस्कूलचे मैदान
*गांधी मैदान
*कमला कॉलेज
व्हिनस गाडी अड्डा
शंभर फुटी रस्ता

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93763 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..