तरूणाला वाचवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरूणाला वाचवले
तरूणाला वाचवले

तरूणाला वाचवले

sakal_logo
By

इराणी खाणीत बुडताना तरुणाला वाचवले
कोल्हापूर ः तराफ्यावरून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आज इराणी खाणीत उतरलेला तरुण तराफा हलल्याने पाण्यात पडला. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत त्याचे प्राण वाचवले. सायंकाळी ही घटना घडली. यश विजय दळवी (वय २२, रा. शुक्रवार पेठ) असे त्याचे नाव आहे. महापालिकेने इराणी खाणीत विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे तराफ्यावरून आत मूर्ती विसर्जनासाठी बंदी घातली होती. ही बंदी धुडकावून यश काही मित्रांसमवेत तराफ्यावरून खाणीत उतरला. त्याला पोहता येत नव्हते. आत गेल्यानंतर तराफा हलला व यश पाण्यात पडला. त्याच्यासोबत असलेल्या तरुणांनी आरडाओरडा केल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान प्रमोद मोरे व विक्रम कुंभार यांनी प्रसंगावधान राखत तरुणाला बाहेर काढले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93764 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..