मुख्य बातमी आकडेवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्य बातमी आकडेवारी
मुख्य बातमी आकडेवारी

मुख्य बातमी आकडेवारी

sakal_logo
By

48205
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील स्वातंत्र्यसैनिक शंकरराव घोरपडे यांच्या कुटुंबातील वीसहून अधिक सदस्यांनी सोमवारी एकत्रितरीत्या रंकाळा तलावजवळ ‘श्रीं’चे पूजन करून मूर्तीचे पर्यावरणपूरक कुंडात विसर्जन केले. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

जिल्ह्यात तीन लाखांवर मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन
कोल्हापूरवासीयांनी यंदाही दिला आदर्श, इचलकरंजीतही मोठा प्रतिसाद प्रशासनातर्फे नेटकी यंत्रणा

दृष्टिक्षेपात
एकूण----
कोल्हापूर - ४० हजार
जिल्‍हा - दोन लाख ५८ हजार ९३२
इचलकरंजी - ९८७५

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : यंदाही कोल्हापूरवासीयांनी पर्यावरणाला साथ देत तीन लाखांवर गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. रात्री नऊपर्यंत जिल्ह्यात दोन लाख ५८ हजार ९३२ तर शहरात ४० हजारांवर तर इचलकरंजीत सुमारे दहा हजार मूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करून राज्यातील आदर्श कायम ठेवला आहे. दिवसभरात जिल्ह्यातून ५६१ तर शहरातून १४० टनांवर निर्माल्य संकलित करण्यात आले. जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच महापालिकेने नेटकेपणाने राबवलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त साथीमुळे कोल्हापूरची पर्यावरण रक्षणाची चळवळ आणखी मजबूत झाल्याचेच स्पष्ट झाले.
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शहरातून सुरू झालेली चळवळ जिल्ह्यातील जलस्त्रोत वाचवण्यासाठी विस्तारत गेली. राज्यात आदर्श निर्माण झाला. त्यानुसार प्रत्येक वर्षी मूर्ती थेट नदी, तलावात, विहिरींऐवजी कृत्रिम कुंडात विसर्जित केल्या जाऊ लागल्या. त्यासाठी यंदाही महापालिकेने शहरात विविध ठिकाणी १८० कुंड ठेवली होती. सार्वजनिक मंडळे, संस्थांनीही कुंडांची व्यवस्था केली होती. नागरिकांनी त्यामध्येच मूर्ती विसर्जित केल्या. सायंकाळी पाचनंतर सर्वच ठिकाणी विसर्जनाला वेग आला. विविध विभागीय कार्यालयांच्या अखत्यारीत विसर्जित केलेल्या मूर्ती इराणी खाणीवर पाठवण्यात आल्याने तसेच स्थानिक नागरिकांमुळे मोठी गर्दी झाली. रात्री उशिरापर्यंत शहरात ४० हजारांवर मूर्ती पूर्यावरणपूरक विसर्जित झाल्या. तसेच, १४० टन निर्माल्य जमा झाले. निर्माल्य पुईखडी येथील बायोगॅस प्रकल्प, कसबा बावडा, बापट कॅम्प, आयसोलेशन हॉस्पिटलजवळ, दुधाळी या ठिकाणी एकत्रित करण्यात आले आहे. तेथे त्यापासून सेंद्रिय खत बनवले जाणार आहे.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी तसेच १२०० वर कर्मचारी रात्री उशिरापर्यंत राबत होते. यंदा प्रथमच खाणीवर बसवलेल्या स्वयंचलित यंत्रणेमुळे मूर्ती सुलभ पद्धतीने विसर्जित करता आल्या. खाणीत ३५ फूट अंतरापर्यंत ही यंत्रणा जात असल्याने मूर्ती एका ठिकाणी विसर्जित होण्याचे टळले. सेकंदाला एक याप्रमाणे मूर्ती विसर्जित झाल्याने गतीही आली.
जिल्हा परिषदेनेही या उपक्रमात दोन लाख ५८ हजार ९३२ मूर्तींचे पर्यावरणपूरक तर सुमारे ५१६ टन निर्माल्य संकलित झाले. १९८६ मूर्तींचे विसर्जन घरीचं करण्यात आले. जिल्हा तसेच तालुकास्तरावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बैठकांच्या माध्यमातून नियोजनाला पाठबळ मिळत गेले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समन्वयासाठी ग्रामपंचायतींनाही जबाबदारी देण्यात आली होती. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93767 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..