नूल परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नूल परिसरातील संक्षिप्त बातम्या
नूल परिसरातील संक्षिप्त बातम्या

नूल परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

47941
नूल : शिवबसव तरुण मंडळाच्या उद्‌घाटनप्रसंगी गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी, प्रियांका यादव, विनोद नाईकवाडी, जितेंद्र शिंदे आदी.

शिवबसव तरुण मंडळाचे उद्‍घाटन
नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथे श्री शिवबसव तरुण मंडळाचे उद्‍घाटन सुरगीश्‍वर मठाचे मठाधिपती श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सरपंच प्रियांका यादव, माजी प्राचार्य विनोद नाईकवाडी, श्रीरंग चौगुले, जितेंद्र शिंदे यांची भाषणे झाली. या वेळी स्वामीजी यांनी आजचे तरुण देशाची शक्ती असून, सर्वांनी विज्ञानाची कास धरण्यासह पर्यावरण वाचविण्याचे आवाहन केले. संजय थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रमास ए. बी. आरबोळे, महादेव मुत्नाळे, दादासो पाटील, राजेंद्र आरबोळे, सुभाष देसाई, कुमार देसाई, शंकर फुटाणे आदी उपस्थित होते.
-----------------------
हलकर्णीत बूस्टर डोसला प्रतिसाद
नूल : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व उपकेंद्रांतर्गत गावातील गणेश मंडळांसमोर नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा उपक्रम राबविला. या उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. कोरोना प्रतिबंधित लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना बूस्टर डोसची गरज आहे. विविध कामांमुळे शेतकरी, नोकरदार, नागरिक व्यस्त असल्याने बूस्टर डोस घेण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वजण गावात असतात, हीच संधी साधून आरोग्य केंद्राने विविध गावांत बूस्टर डोसचा कार्यक्रम राबविला. वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा धबाले, आरोग्यसेविका अर्चना शिंदे, राजश्री सूर्यवंशी, रिया साळुंखे, के. जी. चौगुले, सुनीता घोरपडे, प्रियंका पाटील, माया कुंभार, किरण सुतार, परमेश्‍वर गायकवाड, बी. व्ही. राणगे यांच्यासह आशा वर्कर्स यांनी हा उपक्रम राबविला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93782 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..