बालाजी हायस्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालाजी हायस्कूलचे यश
बालाजी हायस्कूलचे यश

बालाजी हायस्कूलचे यश

sakal_logo
By

48277

बालाजी हायस्कूलचे यश
इचलकरंजी : बालाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत यश मिळवले. पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय रोलबॉल निवड चाचणी स्पर्धेत दोन विद्यार्थ्यांची निवड झाली. योगेश पाटील, अनुज्ञा पाटील यांची मध्यप्रदेश येथील देवास येथे होणाऱ्या स्पर्धेत निवड झाली आहे. तसेच या संघाच्या संघ व्यवस्थापकपदी माजी विद्यार्थ्यांनी प्रगती आरोटे हिची निवड झाली. तसेच जिल्हास्तरीय बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धेत हर्षदा खाडे, निकीता साळी यांची निवड झाली. या स्पर्धा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे होणार आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मदन कारंडे यांच्याहस्ते केले. सचिव महेश कोळीकाल, मुख्याध्यापिका सौ. एम. एस. रावळ, उपमुख्याध्यापक डी. वाय. नारायणकर, कुमार कांबळे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक आर. बी. चौगुले, यु. डी. मेंगणे, रवी चौगुले आदींचे मार्गदर्शन लाभले.
---------
48278
`डीकेएएससी’तर्फे जनजागृती
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने पर्यावरणपूरक घरगुती गणेश विसर्जनासाठी शहरात जनजागृती केली. एएससी कॉलेज परिसरातील विविध कृत्रिम कुंडाजवळ नागरिकांचे प्रबोधन करत पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी प्रोत्साहीत केले. परिसरातील विविध कृत्रिम कुंडावर महानगरपालिकेचे कर्मचारी पोलिसांच्या बरोबरीने काम करत पर्यावरणपूरक विसर्जन कार्याला हातभार लावला. प्राचार्य डॉ. अनिल पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अरूण कटकोळे, विशाल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएसचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.
--------
शिबिरात ७५ जणांचे रक्तदान
इचलकरंजी : रोटरी क्लब व मोरया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबीर झाले. मराठे मिल कॉर्नर येथे झालेल्या शिबीरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी बेलगाम ब्लड सेंटरचे सहकार्य लाभले. रोटरी क्लबचे अध्यक्ष सत्यनारायण धूत, प्रकाश रावळ, अभय यळरूटे, राजाराम जाधव, सुशिल माहेश्‍वरी, शितल चौगुले, मंडळाचे अध्यक्ष प्रशांत सुतार आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93830 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..