डॉ. शिंदे पॉलीटेक्नीकमध्ये स्टार्टअप चित्ररथाचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. शिंदे पॉलीटेक्नीकमध्ये स्टार्टअप चित्ररथाचे स्वागत
डॉ. शिंदे पॉलीटेक्नीकमध्ये स्टार्टअप चित्ररथाचे स्वागत

डॉ. शिंदे पॉलीटेक्नीकमध्ये स्टार्टअप चित्ररथाचे स्वागत

sakal_logo
By

48346
भडगाव : महाराष्ट्र स्टार्टअप चित्ररथाविषयी शिंदे पॉलिटेक्निक व ‘साधना’च्या विद्यार्थ्यांना माहिती देताना प्रद्युम्न आढाव.

डॉ. शिंदे पॉलिटेक्निकमध्ये
स्टार्टअप चित्ररथाचे स्वागत
गडहिंग्लज, ता. ६ : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे पॉलिटेक्निक महाविद्यालयात महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेच्या चित्ररथाचे स्वागत करण्यात आले. जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने या चित्ररथाचे संचलन केले. या वेळी पॉलिटेक्निक व साधना कॉलेज ऑफ व्होकेशनलमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. संस्थेच्या सचिव प्रा. स्वाती कोरी, प्राचार्य अमित शेळके, ‘साधना’चे उपप्राचार्य बी. एस. काटे यांनी चित्ररथाचे स्वागत केले. या वेळी प्रद्युम्न आढाव म्हणाले, की महाराष्ट्र स्टार्टअप योजना विद्यार्थ्यांना बहुउपयोगी ठरणार आहे. नवसंकल्पनांना प्रोत्साहन व पाठबळ देण्यासाठी योजनेचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. स्टार्टअप यात्रेत तालुकास्तरीय प्रचार, प्रसार, प्रबोधन करण्यासाठी मोबाईल व्हॅन असून, त्याद्वारे यात्रेची माहिती व विविध उपक्रमांची माहिती देण्यात येते. नावीन्यपूर्ण कल्पना असलेले नागरिक आपल्या कल्पना नोंदवू शकतात. जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण स्पर्धाही होणार आहे. या वेळी विद्यार्थ्यांना स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी मार्गदर्शनपर चित्रफीत दाखविण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93875 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..