विना उसंत १२ तास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विना उसंत १२ तास
विना उसंत १२ तास

विना उसंत १२ तास

sakal_logo
By

48380

दमले तरी तब्बल १२ तास राबले हात
इराणी खाणीवर कर्मचारी, स्वयंसेवकांकडून विसर्जन; अधिकाऱ्यांनीही लावला हातभार

कोल्हापूर, ता. ६ ः शहरात ठिकठिकाणच्या कुंडांत विसर्जित केलेल्या हजारो मूर्ती, सोबत आलेल्या वाहनांची सायंकाळनंतर इराणी खाणीजवळ लागलेली रांग आणि स्वयंचलित यंत्रणेद्वारे होणारे जलद विसर्जन, यामुळे कर्मचारी, स्वयंसेवकांना तब्बल १२ तास उसंतच मिळाली नाही. कधी कधी तर चार-चार वाहने विसर्जनासाठी लावल्याने त्यांची दमछाक झाली. घामाने चिंब होत त्यांचे अविरत काम पाहून अनेकदा तेथील अधिकारी, पोलिस, नागरिकांनीही त्यांना हातभार लावला.

घरगुती गणेशमूर्ती विसर्जन प्रथमच २२ तास चालले. १८० कुंडांत विसर्जित होणाऱ्या मूर्ती इराणी खणीत आणण्यासाठी ९० टेम्पो, १० डंपर, २४ ट्रॅक्टरची व्यवस्था केली होती. कुंडांच्या ठिकाणी पवडीचे कर्मचारी होते. तिथून भरलेले वाहन खणीजवळ आल्यानंतर त्यातील मूर्ती विसर्जनासाठी ‘अग्निशमन’चे ४० जवान, व्हाईट आर्मी, महाराष्ट्र कमांडो फोर्स, मराठा फोर्सचे ४० स्वयंसेवक होते. सोमवारी सकाळी सातपासून सर्व कामाला लागले होते.
चारनंतर विसर्जनाचे प्रमाण वाढले तसे खणीवर येणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली. कर्मचारी व स्वयंसेवकांनी न थांबता वाहनांतून मूर्ती उतरून घेण्याचा वेग वाढवला. रात्री आठनंतर चार-चार वाहने लावली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या विभागली, त्यामुळे कामाचा ताण वाढला. अग्निशमनच्या भागातील जादा जवानांना बोलवून घेतले. सायंकाळच्या थंड वातावरणातही ते सारे घामाने भिजून चिंब झाले होते. चहा, नाष्टा, जेवणाची सोय महापालिकेने केली होती; पण समोर उभ्या असलेल्या वाहनांची रांग पाहून तेही घ्यायला फुरसत नव्हती. अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, अग्निशमनचे अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह काही नागरिकांनीही मूर्ती विसर्जनासाठी हातभार लावला. रात्री संख्या वाढल्याने विसर्जन गतीने करण्यासाठी तराफ्याचाही वापर केला. पहाटे साडेचार वाजता शेवटच्या वाहनातील मूर्ती विसर्जित केल्या. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी परिसरातील सफाई केली.

प्रशासक पहाटेपर्यंत खणीवर
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे सायंकाळपासून इराणी खणीवर उपस्थित होत्या. मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या पाहून त्या वेळोवेळी सूचना करत होत्या. पहाटेपर्यंत त्या खणीवर थांबून होत्या. त्यांच्यासोबत जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93889 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..