फक्‍त २ लाख ३० हजार लोकांनी घेतला बु्स्‍टर डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फक्‍त २ लाख ३० हजार  लोकांनी घेतला बु्स्‍टर डोस
फक्‍त २ लाख ३० हजार लोकांनी घेतला बु्स्‍टर डोस

फक्‍त २ लाख ३० हजार लोकांनी घेतला बु्स्‍टर डोस

sakal_logo
By

केवळ ११ टक्‍के लोकांनी घेतला बूस्‍टर
लसीकरणाकडे पाठ; शिबिरे घेऊनही नागरिकांची उदासीनता, प्रबोधनाची गरज
सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ६ : दोन वर्षे कोरोनाने जगाला हैराण केले. एकापाठोपाठ एक अशा तीन लाटा आल्या; मात्र तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली तशी कोरोनाची भीतीही लोकांच्या मनातून कमी झाली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये किंवा हा आजार बळावू नये, यासाठी बूस्‍टर डोस घेण्याच्या सूचना केल्या.
कोरोना लाट असताना लोकांनी रांगा लावून लसीकरणासह बूस्‍टर डोस घेतले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांनी लसीकरणासह बूस्‍टरकडेही पाठ फिरवली आहे. जिल्‍ह्यात २१ लाख ७३ हजार १२४ पैकी केवळ २ लाख २८ हजार ५३२ लोकांनीच बूस्‍टर डोस घेतला आहे. बूस्‍टर डोस घ्यावा, यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याला अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
जिल्‍ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. यामध्ये जवळपास २ लाख २१ हजार ४३५ लोक बाधित झाले. यातील ५ हजार ९२८ लोकांचा मृत्यू झाला. यातील पहिली व दुसरी लाट तीव्र होती. तिसरी लाट मात्र तुलनेत सौम्य होती. कोरोनाचा संसर्ग कमी व्‍हावा, कोरोनाने बाधित झाला तरी त्याचा त्रास होऊ नये, यासाठी शासनाने लसीकरणासह बूस्‍टर डोस घेण्याचे आवाहन केले. दुसऱ्या लाटेच्या काळात बऱ्यापैकी लसीकरण केले. मात्र, लशीचा प्रभाव काही महिन्यांनी कमी होत असल्याने बूस्‍टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्‍ह्यात २१ लाख ७३ हजार १२४ लोकांना बूस्‍टर डोस दिला जाणार आहे. आत्तापर्यंत २ लाख १५ हजार ५५४ लोकांनी हा डोस घेतला आहे. लसीकरणामुळे व्‍हायरस व बॅक्‍टेरिया विरोधात लढण्यासाठी आवश्यक रोगप्रतिकारक शक्‍ती वाढत असते. त्यामुळेच बूस्‍टर डोस घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी नागरिकांमधून बूस्‍टर डोस घेण्यास फार उत्‍साह दिसत नाही. त्यामुळेच आरोग्य विभागाकडून विविध पातळीवर प्रयत्‍न सुरू आहेत.

बूस्‍टर डोसचे उद्दिष्ट २१ लाख ७३ हजार १२४
कोविशिल्‍ड २ लाख १५ हजार ५५४
कोव्‍हॅक्सि‍न १२ हजार ४१९
कोर्बीवॅक्‍स ५६०
एकूण लस २ लाख २८ हजार ५३२


कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी खबरदारी म्‍हणून बूस्‍टर डोस घेणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावात शिबिर घेऊन बूस्‍टर डोस दिला जात आहे. कोरोना काळात लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी मोठे सहकार्य केले. त्याचपद्धतीने बूस्‍टर डोससाठीही सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे.
डॉ. योगेश साळे, जिल्‍हा आरोग्य अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93913 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..