रक्त चाचण्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रक्त चाचण्या
रक्त चाचण्या

रक्त चाचण्या

sakal_logo
By

महालॅबमध्ये होतात मोफत चाचण्या
जिल्ह्यात सहा लॅब; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना दिलासा

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः एखाद्या आजारात चाचण्या झाल्या की, त्याआधारे उपचार सुरू होतात, मात्र उपचारातून रुग्ण बरा झाला तर ठीक अन्यथा रुग्ण गंभीर झाल्यास आणखी काही चाचण्या कराव्या लागतात. अशा काही मोजक्या चाचण्या स्‍थानिक पातळीवर होत नाहीत. झाल्या तरी खर्च परवडत नाही, अशा अवस्थेत रुग्णांना दिलासा देणारी बाब म्हणून शासकीय ‘महालॅब’ची सुविधा आहे. येथे काही दुर्मीळ चाचण्या मोफत होत असल्याने रुग्णांना दिलासा मिळत आहे.

कोल्हापुरात खासगी व शासकीय रुग्णांची संख्या उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आहेत. रुग्णांची रक्त, लघवीपासून ते मेंदूच्या चाचण्यांची सुविधा येथे आहेत; मात्र वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन संशोधनातून काही आजारांवरील उपचार अधिक सूक्ष्म पातळीवर केले जातात; मात्र काही गंभीर रोगाच्या मोजक्या काही सूक्ष्म चाचण्या होत नाहीत किंवा खासगी क्षेत्रात होत असल्या तरी त्याचा खर्च २ ते ५ हजारांपर्यंतचा आहे. सर्व सामान्यांना या चाचण्या करून घेणे पैशाअभावी काही वेळा शक्य होत नाही. अशा घटकांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यास व तेथील डॉक्टरांनी काही चाचण्या करण्याचे सुचविल्यास शासकीय महालॅबमधून या चाचण्या मोफत केल्या जातात.

जिल्ह्यात सहा ठिकाणी महालॅबच्या चाचणी सुविधा आहेत. नियमित रक्त, लघवी चाचणीसह कर्करोगापर्यंतच्या चाचण्या होतात. त्यासाठी सीपीआर, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या मोफत केल्या जात आहेत. दिवसाला एक हजारांवर चाचण्या होतात.
- अवधूत टिपुगडे, विभागीय समन्वयक महालॅब.

या होतात चाचण्या.
*कॅन्सर विकारातील कॅन्सर मार्कर किंवा बायएफसी
*इलेक्‍टो फोरसिस (ईबी)
*न्यू बॉर्न बेबी ( एनबी)
*पॅपीस्मेअर (पीएस)
*आर एल -६
*डी डायमर
*एचआयव्ही सूक्ष्म चाचणी
*थायराईड चाचणी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93937 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..