संजीव संकपाळ यांच्या चित्र-शिल्पांचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजीव संकपाळ यांच्या चित्र-शिल्पांचे प्रदर्शन
संजीव संकपाळ यांच्या चित्र-शिल्पांचे प्रदर्शन

संजीव संकपाळ यांच्या चित्र-शिल्पांचे प्रदर्शन

sakal_logo
By

सांस्कृतिक कोल्हापूर- लोगो

४८४१३
संजीव संकपाळ यांच्या
चित्र-शिल्पांचे मुंबईत प्रदर्शन
कोल्हापूर, ता. ६ ः येथील प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार संजीव संकपाळ यांच्या चित्र आणि शिल्पांचे प्रदर्शन मुंबई येथील जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित केले आहे. या प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ झाला असून १२ सप्टेंबरपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.
दळवीज् आर्ट इन्स्टिट्यूट येथे अभिजात चित्रकलेचे शिक्षण घेताना वास्तववादी चित्रकलेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवत जी. डी. आर्टच्या प्रतिष्ठेच्या शेवटच्या वर्षीच्या परीक्षेत राज्यात सहाव्या क्रमांकाने श्री. संकपाळ उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये ‘डीपीएड’ केले. कलामंदिर कला महाविद्यालय येथे शिल्पकलेचे शिक्षण पूर्ण करत ते विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक ठरले.
कोल्हापूर आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कला चळवळीत ते सक्रिय असतात. ‘रंगबहार’ या संस्थेचे ते सचिव म्हणून कार्यरत आहेत. देश-विदेशातील अनेक कला उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. पूर्णवेळ अभिजात चित्र-शिल्पकलेमध्ये काम करताना कोरोना लॉकडाउन काळात मानवी शरीर आणि त्याची देहबोली या विषयाच्या चिंतनातून तयार झालेल्या त्यांच्या कलाकृती प्रदर्शनात मांडल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र शासनाचे कला संचालक विश्वनाथ साबळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93946 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..