गोकुळ''ची ताराबाई पार्कातील जुनी इमारत कालबाह्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ''ची ताराबाई पार्कातील जुनी इमारत कालबाह्य
गोकुळ''ची ताराबाई पार्कातील जुनी इमारत कालबाह्य

गोकुळ''ची ताराबाई पार्कातील जुनी इमारत कालबाह्य

sakal_logo
By

48438


‘गोकुळ’ची इमारत कालबाह्य
स्ट्रक्‍चरल ऑडिट; ताराबाई पार्कातील कार्यालये अन्यत्र; घटनांची साक्षीदार
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ६ : उच्चतम गुणवत्ता आणि नैसर्गिक चवीची उत्पादने तयार करण्यासाठी आणि दूध महापूर (ऑपरेशन फ्लड) योजनेचे नियोजन व पाया ज्या इमारतीमध्ये रचला, ते कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाची ताराबाई पार्क येथील इमारत कालबाह्य झाली आहे. गोकुळने इमारतीचे अंतर्गत स्ट्रक्‍चरल ऑडिट केले आहे. यामध्ये ही इमारत आता वापरास धोकादायक ठरवली आहे. त्यामुळे या इमारतीत असणारी पशुवैद्यकीय विभागासह इतर विभाग इतरत्र हलवले आहेत.
१६ मार्च १९६३ मध्ये गोकुळची स्थापना झाली. २२ संस्था सभासद आणि ४० व्यक्ती सभासद असे एकूण ६२ सभासदांवर गोकुळचा रथ पुढे सरकत राहिला. ताराबाई पार्क येथील याच इमारतीमध्ये शासनाने ‘दुग्ध व्यवसाय विकास विभाग कोल्हापूर दूध योजने’चे मध्यवर्ती कार्यालय म्हणून तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब सावंत यांच्या हस्ते २५ मे १९६८ ला सुरुवात केली. दरम्यान, १९७३ मध्ये ‘कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मिल्क फेडरेशन’चे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ असे मराठीत नामकरण झाले. त्यानंतर ताराबाई पार्क येथील ज्या इमारतीमध्ये शासकीय दूध योजनेच काम सुरू होते. त्या इमारतीचे हस्तांतरण कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाकडे केले. ३० एप्रिल १९८५ ला तत्कालीन कामगारमंत्री अनंतराव थोपटे व दुग्धव्यवसाय विकास आयुक्त नंदकुमार पाटील यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या उपस्थितीत गोकुळचे कामकाज सुरू झाले.
६०-६२ वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस झेलणाऱ्या या इमारतीचे काही महिन्यांपूर्वी स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले. यामध्ये इमारतींच्या उभ्या-आडव्या सिमेंटच्या बिंबातील तुकडे काढून त्याचे परीक्षण झाले. त्यानंतर ही इमारत वापरण्यास धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महत्त्वाचे विभाग इतरत्र सुरू केले. सध्या केवळ अध्यक्ष व संचालक मंडळाचे कामकाज या ठिकाणी सुरू आहेत. याशिवाय तिथे काम करणाऱ्या काही कर्मचारी, जनसंपर्क अधिकारी व त्यांच्याकडे येणाऱ्या अभ्यागतांसाठी स्वच्छतागृह सुरू आहे.

कोट
ही इमारत जुनी आहे. त्यामुळेच याचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले. ही इमारत वापरण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे या ठिकाणची कार्यालये इतर ठिकाणी सुरू आहेत.
- विश्‍वास पाटील, अध्यक्ष, गोकुळ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93977 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..