ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम वक्तृत्त्व स्पर्धेचा निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम वक्तृत्त्व स्पर्धेचा निकाल
ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम वक्तृत्त्व स्पर्धेचा निकाल

ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम वक्तृत्त्व स्पर्धेचा निकाल

sakal_logo
By

ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम
वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

कोल्हापूर : ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे चिंतामण रामचंद्र तथा राजाभाऊ जोशी यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुलभा जोशी पुरस्कृत वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. ४० शाळांमधून २८१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. रविवारी निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर उपस्थित होते. स्पर्धेत नेहरूनगर विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे दत्तात्रय कुलकर्णी, संचालक अशोक कुलकर्णी यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला कायमस्वरूपी ढाल बक्षीस देण्यात आली. क्रमांकांऐवजी ‘मुलांसाठी सर्वोत्तम वक्ता, मुलींसाठी सर्वोत्तम वक्त्या’ अशी पारितोषिके ठेवण्यात आली. त्यामुळे मुलांच्या मनात केवळ स्पर्धा असावी, ईर्षा नसावी, असे मत दीपक भागवत यांनी व्यक्त केले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रके, पुस्तके अशी भेट देण्यात आली. संचालक संतोष कोडोलीकर, व्यवस्थापक अशोक जोशी, श्रीकांत नांगनूरकर, सेवक वर्ग यांनी सहकार्य केले. स्पर्धा प्रमुख म्हणून दीपक भागवत, दासबोध अभ्यास मंडळाचे गोविंद पाटगांवकर, प्रा. तन्मय कुलकर्णी यांनी काम पाहिले. संस्थेचे संचालक नंदकुमार मराठे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष अॅड. विवेक शुक्ल यांनी स्वागत केले. कार्यवाह श्रीकांत लिमये यांनी स्पर्धेच्या निकालाचे वाचन केले. खजानीस रामचंद्र टोपकर यांनी आभार मानले.
निकाल असा : गट क्रमांक पहिला (तिसरी, चौथी) सर्वोत्तम : दीपिका दीक्षित, परिणिती धामणकर, आराध्या जठार, श्रेया कांबळे, समृद्धी खुडे, अनुज मिठारी, प्रणव ओंकार, वीर सातार्डेकर, वरद वरणे, साक्षी यादव, अनय ढवळे. गट दुसरा (पाचवी, सहावी, सातवी) सर्वोत्तम : अनघा गुरव, रुद्राक्षी हिरेमठ, सुहानी कदम, अथर्व खांबे, ब्रह्मतेज मुनीश्वर, सबा मणेर, अनन्या रायरीकर, विश्ववेदा सावंत. गट तिसरा -(आठवी, ९ वी व १० वी) : अभिरत्न मिणचेकर, कल्याणी कुलकर्णी, सिद्धी नाईक, शंतनू रायरीकर.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93978 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..