आजरा नगरपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा नगरपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद
आजरा नगरपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद

आजरा नगरपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद

sakal_logo
By

आजरा नगरपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद
आजराः आजरा नगरपंचायतीतर्फे नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा संजीवनी सावंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पाटील यांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. याला नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळाला. बहुतांश नागरिकांनी गणेश विसर्जन नदी, तलाव, विहिरीमध्ये न करता आजरा नगरपंचायतीतर्फे तयार केलेल्या विसर्जन कुंडामध्ये केले. यामुळे पाणी प्रदूषण टाळण्यास मदत झाली. शहरात नबाबपूर, नदीघाट, वडाचा गोंड, चित्रा नदी घाट व परोली बंधारा या ठिकाणी निर्माल्य स्वीकारण्यात आले. निर्माल्य स्वीकारण्यासाठी दोन व अन्य दोन अशी चार पथके तैनात केली होती. अण्णा-भाऊ आजरा तालुका सूतगिरणीचे सहकार्य या उपक्रमाला मिळाले. शहरात सुमारे ७५० किलो निर्माल्य जमा झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93995 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..