गोकुळ सहकारी नागरी पतसंस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ सहकारी नागरी पतसंस्था
गोकुळ सहकारी नागरी पतसंस्था

गोकुळ सहकारी नागरी पतसंस्था

sakal_logo
By

48451

गोकुळ पतसंस्था दूध उत्पादकांचा आधार
अध्यक्ष शशिकांत पाटील; वार्षिक सभेत ठराव नामकरणाचा ठराव मंजूर
कोल्‍हापूर, ता. ६. कोल्हापूर जिल्हा ग्रामीण गोकुळ सहकारी नागरी पतसंस्था कमी व्याजामध्ये, तत्काळ सेवा देणारी आणि दूध उत्पादकांची आधार देणारी संस्था आहे, असे मत पतसंस्तेचे अध्यक्ष शशिकांत पाटील-चुयेकर यांनी व्यक्त केले. कोल्‍हापूर जिल्हा ग्रामीण (गोकुळ) सहकारी नागरी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज संस्थेच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात झाली. यावेळी गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील उपस्थित होते. विषय वाचन व्यवस्थापक भगवान मोरे यांनी केले.
अध्यक्ष शशिकांत पाटील-चुयेकर म्हणाले, ‘‘पतसंस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त दूध उत्पादकांना जनावरे खरेदी करण्यासाठी कमी व्याजदराने कर्ज दिले जाईल. म्हैस दूध उत्पादनात वाढीसाठी पतसंस्था कटीबद्ध आहे. सभासदांनी आणि सदस्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास यामुळे मी चांगले काम करू शकलो.’’
गोकुळचे अध्यक्ष व संस्थेचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, ‘‘पतसंस्थेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील दूध उत्पादकांना गाय व म्हैस खरेदीसाठी कमी कागदपत्रे व कमी व्याजदराने प्राथमिक दूध संस्थाना कर्ज पुरवठा करणे हा आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून प्राथमिक दूध संस्था आणि दूध उत्पादक यांचा विकास हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून कामकाज करू.’’
ग्रामीण गोकुळ पतसंस्थेचे बँकेमध्ये रुपांतर करावे त्यासाठी खात्याची आणि शासनाची मंजुरी घेऊन पुढील कार्यवाही करावी असा ठराव आनंदा पाटील वडकशिवाले यांनी मांडला व स्व.आनंदराव ज्ञा.पाटील (चुयेकर) कोल्हापूर जिल्हा ग्रामीण गोकुळ सहकारी नागरी पतसंस्था लि.,कोल्हापूर अश्या संस्थेच्या नामकरणास जनरल सभेत सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
संस्थेची वार्षिक उलाढाल ५३ कोटी २१ लाख ५४ हजार ४०६ रुपये असून, ठेव ६ कोटी ५५ लाख ४ हजार ८०० रुपये व संस्थेची गुंतवणूक ३ कोटी ६ लाख ५१ हजार,कर्जे १० कोटी ५ लाख ६१ हजार ३८८ रुपये, डीव्हीडंट ७ प्रमाणे जाहीर केला, ऑडीट वर्ग अ ,एन.पी.ए टक्के आहे.निव्‍वळ नफा २९ लाख ८३ हजार ८०२ रुपये इतका आहे. तर आभार संस्थेचे व्हा.चेअरमन आय.ए.पाटील यांनी मानले. यावेळी संस्थेचे संचालक सुभाषराव चौगले, रामचंद्र चव्हाण, सुनील आमते, श्रीकांत पाटील, मारुती नाईक, निशिकांत कांबळे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94009 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..