माधुरी अनुजे यांना कॅन्सर संशोधनाबद्दल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माधुरी अनुजे यांना कॅन्सर संशोधनाबद्दल
माधुरी अनुजे यांना कॅन्सर संशोधनाबद्दल

माधुरी अनुजे यांना कॅन्सर संशोधनाबद्दल

sakal_logo
By

४८४८७

डी. वाय. विद्यापीठाची
अनुजे यांना पीएचडी

कोल्हापूर, ता. ६ : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंटरडिसिप्लेनरी रिसर्च’च्या विद्यार्थिनी माधुरी अनुजे यांना वैद्यकीय भौतिकशास्त्र या विषयातून विद्यापीठाकडून पीएचडी पदवी जाहीर झाली आहे. अनुजे यांनी ‘कॅन्सर रेडिएशन थेरपी सेन्सिटायझर’ या विषयावरील प्रबंध सादर केला. त्यांना प्रा. डॉ. पद्मजा पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले. माधुरी या विद्यापीठातील कॅन्सर विषयामधून वैद्यकीय भौतिकशास्त्रमध्ये पीएचडी करणाऱ्या प्रथम विद्यार्थिनी आहेत. त्यांच्या संशोधनानुसार ‘सुपर पॅरामॅग्नेटिक आयर्न ऑक्साईड नॅनोपार्टिकल्स’चा रेडियो सेन्सिटायझर म्हणून वापर केला आहे. पुढील कालावधीत ‘कॅन्सर’ रेडिएशन थेरपीमध्ये रेडिएशनचे धोके व दुष्परिणाम कमी करण्यास पर्याय होऊ शकतो. त्यांच्या शोधानुसार नॅनोकणचा वापर करून कोलोरेक्टल कॅन्सर बरा होऊ शकतो. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, बायोटेक विभाग प्रमुख डॉ. मोहन करुपाईल यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94054 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..