लक्ष्मीसेन महास्वामींची आदिनाथ बँकेला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मीसेन महास्वामींची आदिनाथ बँकेला भेट
लक्ष्मीसेन महास्वामींची आदिनाथ बँकेला भेट

लक्ष्मीसेन महास्वामींची आदिनाथ बँकेला भेट

sakal_logo
By

48236
-----------
लक्ष्मीसेन महास्वामींची
आदिनाथ बँकेला भेट
इचलकरंजी, ता. ७ ः सिंहनगद्दे नरसिंहराजपूर येथील ज्वालामालिनी देवी अतिशय क्षेत्राचे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी येथील आदिनाथ को-ऑप बँकेच्या प्रधान कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे बँकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, ग्राहकांनी दर्शन घेतले. त्यानंतर महास्वामींचे पादपूजन केले.
प्रत्येक गोष्टीचा शोध महत्त्वाचा असून, असाच जीवन जगण्याचा शोध जैनधर्मीय आद्यतीर्थंकर भगवान आदिनाथांनी लावला आहे. जीवन कसे जगावे, हे जैन धर्मातील आचरणाच्या अनुषंगाने त्यांनी मार्गदर्शन केले. आदिनाथ बँकेच्या अनेक शााखा व्हाव्यात, असे अभीष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या.
चेअरमन सुभाष काडाप्पा, व्हाईस चेअरमन बाळासाहेब केटकाळे, संचालक कुंतिलाल पाटणी, डॉ. पारिसा बडबडे, जिनेंद्र खोत, संचालिका पद्मावती लडगे, माजी संचालक मोहन चौगुले, सी. डी. लडगे, अनिल बम्मण्णावर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94056 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..