तंदुरूस्त बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तंदुरूस्त बंदोबस्त
तंदुरूस्त बंदोबस्त

तंदुरूस्त बंदोबस्त

sakal_logo
By

पोलिसांसाठी आज
‘तंदुरुस्त बंदोबस्त’ उपक्रम
--
डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्टचे यंदाही पाठबळ

कोल्हापूर, ता. ६ ः विघ्नहर्त्या गणरायाचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी अहोरात्र डोळ्यांत तेल घालून कडेकोट बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिसांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी सकाळ माध्यम समूहातर्फे यंदाही तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमाचे आयोजन केले आहे. उद्या (बुधवारी) सायंकाळी चारला पोलिस मैदानाजवळील अलंकार हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ‘सकाळ’ परिवाराने केले असून, डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्ट व डीवायपी ग्रुपने या उपक्रमाला यंदाही पाठबळ दिले आहे. सततची ड्यूटी आणि त्यामुळे आहाराकडे होणारे दुर्लक्ष यामुळे तंदुरुस्त आहार हा पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय बनला आहे. दहा वर्षांपूर्वी पोलिसांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करून ‘सकाळ’ने ‘तंदुरुस्त बंदोबस्त’ ही मोहीम हाती घेतली. याबाबत जागृती करताना चांगल्या आहारासाठी अशा प्रकारच्या मोहिमेतून पोलिसांना पाठबळ देण्याचे काम केले आहे. साहजिकच समाजातील सर्वच घटक या मोहिमेत सक्रिय सहभागी होत आहेत. दरम्यान, काही मंडळेही यंदा स्वयंस्फूर्तीने हा उपक्रम करणार आहेत. पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वच घटक पुढे सरसावणार आहेत. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात पोलिसांना चिक्की वाटप केले जाईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94058 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..