जिल्हा बाजार समितीची निवडणूक २९ जानेवारीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बाजार समितीची 
निवडणूक २९ जानेवारीला
जिल्हा बाजार समितीची निवडणूक २९ जानेवारीला

जिल्हा बाजार समितीची निवडणूक २९ जानेवारीला

sakal_logo
By

बाजार समितीची
निवडणूक २९ जानेवारीला
---
२७ सप्टेंबरपासून प्रक्रिया सुरू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल सात वर्षांनंतर आज जाहीर झाली आहे. त्यानुसार येत्या २७ सप्टेंबरपासून संभाव्य मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू होईल. तसेच, २९ जानेवारीला मतदान होईल. दुसऱ्या दिवशी (ता. ३०) मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. यासंदर्भातील आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी दिले. दीर्घ कालावधीने बाजार समितीची निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
शेती उत्पन्न बाजार समितीवर असलेल्या प्रशासक मंडळाची मुदत संपून चार महिने झाले. त्यानंतर समितीच्या सचिवांच्या अखत्यातरीत नित्य व्यवहार होत असल्याने कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नव्हता. अशा स्थितीत बाजार समितीवर प्रशासक पाठवावा किंवा निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी होती. यातच राज्यात सत्ता बदलाची स्पर्धा लागल्याने निवडणुकांबाबतचा निर्णय लांबणीवर पडला होता.
नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यावर बाजार समिती निवडणुकीचे आदेश निघाले. यापूर्वी बाजार समितीत २०१५ मध्ये निवडणूक झाली होती, तेव्हा राष्‍ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, जनसुराज्य व शेतकरी कामगार पक्षाचे प्रतिनिधी संचालक म्हणून निवडून आले. याच संचालक मंडळाच्या काळात गैरव्यवहार झाल्याचा ठपका बसला. त्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये संचालक मंडळाने राजीनामे दिले. त्यानंतर प्रशासक मंडळ आले. त्यातही वरील पक्षाचे प्रतिनिधी होते. माजी आमदार के. पी. पाटील प्रशासक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यानंतर कोरोना आला. समितीचे व्यवहार थंडावले, अशात प्रशासक मंडळाची मुदत पाच महिन्यांपूर्वी संपली.

निवडणूक प्रक्रिया अशी ः
जिल्हा निबंधक, संस्था गटविकास अधिकाऱ्यांकडून सदस्य सूची मागविणे ः २७ सप्टेंबर
प्रारूप मतदार यादीसाठी सदस्य सूची बाजार समिती सचिवांकडे देणे ः ३ ऑक्टोबर
सचिवांनी प्रारूप मतदान यादी तयार करणे ः ३ ते ३१ ऑक्टोबर
सचिवांनी प्रारूप मतदार यादी निवडणूक अधिकाऱ्यांना देणे ः १ नोव्हेंबर
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदार यादी प्रसिद्ध करणे ः १४ नोव्हेंबर
मतदार यादीवर हरकती मागविणे ः १४ ते २३ नोव्हेंबर
हरकतींवर निर्णय घेणे ः २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे ः ७ डिसेंबर
निवडणूक कार्यक्रम जाहीर ः २३ डिसेंबर

निवडणूक कार्यक्रम असा ः
अर्ज दाखल करणे ः २३ ते २९ डिसेंबर
अर्जांची छाननी ः ३० डिसेंबर
वैध अर्ज प्रसिद्धी ः २ जानेवारी
उमेदवारी मागे घेणे ः २ ते १६ जानेवारी
उमेदवार यादी व निशाणी वाटप ः १७ जानेवारी
मतदान ः २९ जानेवारी
मतमोजणी ः ३० जानेवारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94072 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..