विसर्जन आकर्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जन आकर्षण
विसर्जन आकर्षण

विसर्जन आकर्षण

sakal_logo
By

रशियन डीजे, चित्ररथ अन् धनगरी ढोल
---
गणेश विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण; प्रबोधनपर संदेशाबरोबरच सामाजिक प्रश्नांवर भाष्यही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत रशियन डीजेबरोबरच मल्टिकलर शार्पींच्या झगमगाटासह भव्य एलईडी स्क्रीन्सच्या साक्षीने मिरवणूक रंगणार असली, तरी काही मंडळे पारंपरिक थाट कायम ठेवणार आहेत. विविध विषयांवरील प्रबोधनपर संदेशाबरोबरच चित्ररथांच्या माध्यमातूनही सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले जाईल.
दरम्यान, परंपरेप्रमाणे तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीची आरती झाल्यावर मिरवणुकीला प्रारंभ होईल. तटाकडील तालीम परिसरातील दोन कार्यकर्त्यांचे निधन झाल्याने या तालमीची मिरवणूक यंदा साध्या पद्धतीने होणार आहे. मंगळवार पेठ कोष्टी गल्ली क्रमांक दोनमधील श्री तरुण मंडळही यंदा टाळ्या वाजवत मिरवणुकीत सहभागी होणार आहे.

अशी असेल मिरवणूक...

रंकाळवेश तालीम
- गणेश रथासह आकर्षक फुलांची सजावट
- आकर्षक रोषणाई
............
पाटाकडील तालीम मंडळ
- ढोल- ताशा पथकांचा पारंपरिक थाट
- पिवळ्या-निळ्या रंगांचे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांचा सहभाग
..........
दिलबहार तालीम मंडळ
- निळ्या-पांढऱ्या रंगांच्या मोठ्या
झेंड्यासह कार्यकर्त्यांचा सहभाग
.................
जुना बुधवार तालीम मंडळ
- जुना बुधवार, शुक्रवार-शनिवार पेठेची मिळून एकच मिरवणूक
- ऐंशी मंडळे, सहा तालमीच्या कार्यकर्त्यांसह महिलांचा सहभाग
-ढोल- ताशांचा गजर
............
बाबूजमाल तालीम
- चोवीस वादकांचे नाशिक ढोल-ताशा पथक
- पांढरा कुर्ती, भगवी टोपी अशा पारंपरिक वेशभूषेत कार्यकर्त्यांचा सहभाग
- सकाळी अकरा वाजता मिरवणुकीला प्रारंभ
.............
लेटेस्ट तरुण मंडळ
- राजर्षी शाहू कार्यावर आधारित चरित्र चित्रमय चित्ररथ
- सुमारे २५० कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत असतील.
- भुयेवाडीतील धनगरी ढोल, गोळीवडे येथील १२० जणांचे झांजपथक,
डोक्यावर राजर्षी शाहूंची कॅप, संस्थानकालीन झेंड्यासह मिरवणूक
..........
अवचित पीर तालीम
- रशियन डीजे
- दहा फूटी मास्कचे आकर्षण
...........
उत्तरेश्वर वाघाची तालीम
-तालमीच्या नावाच्या लाल-पांढऱ्या रंगातील पट्ट्या बांधून कार्यकर्त्यांचा सहभाग
-दगडूशेठ हलवाई गणपतीच्या धर्तीवर मूर्तीसाठी फुलांची आरास
..........
सुबराव गवळी (प्रॅक्टिस क्लब)
- औरंगाबादची आकर्षक विद्युत रोषणाई
- आकर्षक गणेश मूर्तीसह सजावट
...........
दयावान ग्रुप
-१० बाय २० फुटांची वायरलेस स्क्रीन
............
खंडोबा तालीम मंडळ
- मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांसह महिलांचा सहभाग
- पांढऱ्या-निळ्या रंगाच्या झेंड्यासह कार्यकर्त्यांचा सहभाग
...............
फिरंगाई
- पुणे येथील फुलांच्या सजावटीचा सेट
- व्हाईट लॅम्पचा झगमगाट
............
वेताळ तालीम मंडळ
- फुलांची आकर्षक सजावट
-‘वेताळ’ टोप्यांसह कार्यकर्त्यांचा सहभाग
.........
हिंदवी स्पोर्टस्‌
- पुणे येथील लाईट सिस्टीम
..........
बीजीएम स्पोर्टस्
- पुणे येथील डीजे व ढोलताशा पथक
-अत्याधुनिक लाईट सिस्टीम, आकर्षक सजावट.
..........
बालगोपाल तालीम
- आकर्षक विद्युत रोषणाई,
- पारंपरिक हलगी पथक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94118 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..