जपानमध्येही गणेशोत्सवाचा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जपानमध्येही गणेशोत्सवाचा जल्लोष
जपानमध्येही गणेशोत्सवाचा जल्लोष

जपानमध्येही गणेशोत्सवाचा जल्लोष

sakal_logo
By

48540

जपानमध्येही गणेशोत्सवाचा जल्लोष
भारतीय समुदायाच्या वतीने आयोजन ः विविध उपक्रमांतून परंपरेची जोपासना

इचलकरंजी, ता.७ ः गणेशोत्सव केवळ महाराष्ट्र अथवा देशातच नव्हे जगभरातील विविध देशांतही भारतीय समुदायाकडून साजरा केला जातो. जपानमधील योकोहामा शहरातही यंदा भारतीय समूहाकडून पारंपरिक पद्धतीने जल्लोषात साजरा केला. सात वर्षे हा सण मंगलमय वातावरणात साजरा करण्यात येतो. त्यामुळे या शहरातील स्थानिक नागरिकांना हा सण मोठा कुतूहलाचा विषय ठरला आहे.
यंदाही योकोहामा मंडळातर्फे गणेशमूर्तीचे जल्लोषात स्वागत केले. यासाठी मुंबईतील घाटकोपर येथून मूर्ती आणली होती. ढोल-ताशा, झांज, लेझीम या वाद्यांच्या गजरात किरीगाओकाचा, योकोहामाचा परिसर दुमदुमला. बाप्पांना सुंदर पालखीत विराजमान करून ध्वज पताका फडकवत सुबक रांगोळ्या काढून भव्य मिरवणूक काढली. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले. पुरुष व महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकीत इस्रोच्या यांनाचा हलता देखावा बच्चे कंपनीसाठी आकर्षणाचा ठरला.
मंडळातर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये चित्रकला, प्रश्नमंजूषा, श्लोक स्तोत्र पठण, विविध मैदानी खेळ यांचा समावेश होता. यात सुमारे १२५ मुलांनी सहभाग घेतला. तेवढ्याच संख्येने मोठ्यांचा सहभागही नोंदवला गेला. याचबरोबर गायन नृत्य, वाद्यवादन, कथाकथन झाले. ५० विविध कार्यक्रम सादर केले. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94141 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..