`व्यंकटराव`मध्ये गोगटे यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

`व्यंकटराव`मध्ये गोगटे यांना अभिवादन
`व्यंकटराव`मध्ये गोगटे यांना अभिवादन

`व्यंकटराव`मध्ये गोगटे यांना अभिवादन

sakal_logo
By

‘व्यंकटराव’मध्ये गोगटे यांना अभिवादन
इचलकरंजी ः येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये माजी मुख्याध्यापक वा. गो. गोगटे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले. त्यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष डॉ. गो. सि. ढवळे व चेअरमन सुनील नवाल यांनी केले. त्यांनी गोगटे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. मुख्याध्यापक ए. ए. खोत यांनी प्रास्ताविक केले. सौ. आर. व्ही. परीट यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापिका सौ. ए. एम. कांबळे यांनी आभार मानले. उपाध्यक्ष दीपक राशिनकर, सेक्रेटरी कौशिक मराठे, सदस्य जी. एस. इंगळे, पर्यवेक्षक एम. एस. खराडे, कार्याध्यक्षा सौ. जे. ए. कोळी आदी उपस्थित होते.
-------
शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर
इचलकरंजी ः येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये सौ. गौरी पावगी (पूर्वप्राथमिक), सौ. रजनी घोडके (प्राथमिक), सौ. उमा जाधव (माध्यमिक), राजाराम झपाटे (उच्च माध्यमिक), प्रा. वीरुपाक्ष खानात (महाविद्यालय) यांचा समावेश आहे. सौ. संगीता बिरनाळे यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार वितरण १२ सप्टेंबरला आहे. अध्यक्ष प्रा. मोहन पुजारी व सचिव नरसिंह वझे यांनी ही माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94143 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..