चित्रफितीच्या माध्यमातून उलघडणार दानोळी गावाचा इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रफितीच्या माध्यमातून उलघडणार दानोळी गावाचा इतिहास
चित्रफितीच्या माध्यमातून उलघडणार दानोळी गावाचा इतिहास

चित्रफितीच्या माध्यमातून उलघडणार दानोळी गावाचा इतिहास

sakal_logo
By

48567
दानोळी : येथील पहिल्या ग्रामपंचायतीचे सदस्य.
48568
गावातील पहिले ताज हॉटेल.
----------

चित्रफितीतून उलगडणार दानोळीचा इतिहास
---
छत्रपती प्रतिष्ठानचा उपक्रम; सोळाशे वर्षांपूर्वीपासूनच्या आठवणींना उजाळा
युवराज पाटील ः सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. ७ ः दानोळी गावाचे नाव कसे पडले?, गावात पहिली एस.टी. कशी व कधी आली? गावचा राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, क्रीडा वारसा काय आहे? याचे कुतूहल सर्वांनाचा आहे. नवीन पिढीला तर गावाचा इतिहासच माहीत नाही. म्हणून येथील छत्रपती प्रतिष्ठानने संपूर्ण गावाचा इतिहास चित्रफितीच्या माध्यमातून उलगडणार आहे. उद्या (ता. ८) सायंकाळपासून मिरवणुकीमधून ही चित्रफीत दाखवून त्याबरोबर माहितीही सांगण्यात येणार आहे.
यात १६०० वर्षांपूर्वी चालुक्य काळातील संदर्भ मिळाला आहे. त्या वेळेपासून दानोळी गाव, त्याचे नाव कसे पडले, त्यासंदर्भातील आख्यायिका याची माहिती सादर होईल. त्याचबरोबर गावातील पहिली एस.टी. सुरू झाली, पहिल्या ग्रामपंचायतीचे सदस्य, गावातील पहिले हॉटेल, गावातील पहिली हिंदकेसरी बैलजोडी, सरकार घराण्याचा इतिहास, गावातील मंदिरांचा इतिहास व त्यांची दुर्मिळ छायाचित्रे दाखविण्यात येणार आहेत. शेतीत प्रगती करताना ४२ वर्षांपूर्वी गावात पहिले टोमॅटोचे पीक, पहिल्यांदा कलिंगडची शेती कशी केली यांची माहिती देण्यात येणार आहे.
गावातील त्या काळातील प्रसिद्ध व्यक्ती, त्यांचा पेहराव, त्यांची परंपरा, जुनी दुर्मिळ छायाचित्रे, राजदरबार, महत्त्वाच्या ठिकाणांची छायाचित्रे या युवकांनी एकत्रित केली आहेत. त्याची स्क्रीप्ट तयार केली असून, ती चित्रफितीबरोबर सांगण्यात येईल. महिनाभरापासून हे युवक माहिती, छायाचित्रे, त्यासंदर्भातील इतिहास गोळा करीत आहेत. छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल माने, उपाध्यक्ष आप्पासो कुंभाजे, मार्गदर्शक उदय राऊत, विकास वाळकुंजे, अभिनंदन पाराज, सुभाष हेर्ले आदी परिश्रम करीत आहेत.
--------------
गावाचा जुना इतिहास हा आमच्यासह नवीन पिढीला अनोखा आहे. त्याची देवाण-घेवाण झाल्याशिवाय त्याचे गांभीर्य समजणार नाही. त्या काळात त्या वेळच्या परिस्थितीची संस्कृती, परंपरा, पराक्रम यासह सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक अनुष्ठान काय होते, त्याचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्यासाठी गावाचे सहकार्य मिळत आहे.
- अभय राऊत, छत्रपती प्रतिष्ठान

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94165 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..