गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

48586
गडहिंग्लज : शिवराजमध्ये एन. आर. शेडेकर यांचा सत्कार करताना प्रा. किसनराव कुराडे. शेजारी व्ही. एस. पाटील, बिनादेवी कुराडे, शंकरराव नंदनवाडे, एस. एम. कदम आदी.

शिवराजमध्ये निवृत्त शिक्षकांचा सन्मान
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त निवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिवराजचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे अध्यक्षस्थानी होते. निवृत्त शिक्षक एन. आर. शेडेकर, आर. के. पाटील, एस. बी. पोवार, उर्मिला सुतार यांच्यासह मुख्याध्यापक प्रल्हादसिंह शिलेदार यांचा सत्कार प्रा. कुराडे यांच्या हस्ते झाला. पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी स्वागत केले. प्रमुख पाहुणे अ‍ॅड. व्ही. एस. पाटील यांचे भाषण झाले. प्रा. कुराडे यांनी अध्यक्षीय भाषण केले. संचालक शंकरराव नंदनवाडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी शिक्षकदिनाविषयी माहिती दिली. सचिव डॉ. अनिलराव कुराडे, प्रा. बिनादेवी कुराडे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
----------------
‘शिंदे’मध्ये शैक्षणिक धोरण वेबिनार
गडहिंग्लज : येथील दिनकरराव शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिक्षक दिनी एकदिवसीय वेबिनार झाले. पुण्याच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वरिष्ठ अधिव्याख्याता सरस्वती सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले. शिक्षकांनी बदल स्वीकारून स्वत:ची मानसिकता तयार करणे, तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे, गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविणे, आरोग्याचे शिक्षण देणे, कृती अध्यापनासाठी योग्य वातावरण ठेवणे, पालक व समाजाशी हितसंबंध जोडण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. एस. एम. रायकर यांनी मार्गदर्शन केले. एस. जे. घाटगे यांनी आभार मानले.
----------------
कौलगे प्रशालेत शिक्षक दिन
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका एस. एस. इनामदार व शाळेतील मुख्यमंत्री श्रवण वडर यांच्या हस्ते झाले. निवृत्त प्राथमिक शिक्षक राजाराम शिंदे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विश्‍वजित चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुनील माने, अथर्व केसरकर, श्रवण वडर यांनी मनोगत व्यक्त केले. जयदीप गाडीवड्ड याने सूत्रसंचालन केले. वेदांत पोवार याने आभार मानले. स्वाती पाटील, बळीराम पाटील, दिपक सावंत, सुरेखा नंदनवाडे, नामदेव यादव, बाळासाहेब मोहिते, दुंडाप्पा कांबळे, गजानन काटकर उपस्थित होते.
-----------------
जागृती शिक्षणशास्त्रतर्फे वृक्षारोपण
गडहिंग्लज : येथील जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक डॉ. एस. एम. कोल्हापुरे यांच्या हस्ते झाले. कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी उपस्थित होते. उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक किशोर हंजी, महेश घाळी, प्राचार्य डॉ. सुधाकर शिंदे, शिक्षक, कर्मचारी, छात्रशिक्षक उपस्थित होते.
-----------------
शिवराज इंग्लिश स्कूलमध्ये कार्यक्रम
गडहिंग्लज : येथील शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यानी एक दिवस शिक्षक होऊन अध्यापनाचा अनुभव घेतला. मिराबाद कमते हिने मुख्याध्यापिकेची जबाबदारी सांभाळली. शिक्षकांच्या वेशात विद्यार्थी शाळेत आले होते. दुपारी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. सातवीच्या विद्यार्थ्यांनी कलागुण सादर केले. श्रीवर्धन म्हेत्री, श्रावणी पाटील, रोशन पाटील आदींनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापिका गौरी शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी शिक्षक दिनाच्या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले. शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94178 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..