तू सुखकर्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तू सुखकर्ता
तू सुखकर्ता

तू सुखकर्ता

sakal_logo
By

लोगो-
तू सुखकर्ता
....
फोटो- 48786
....

बाप्पांनी केले शिक्षणातील विघ्न दूर
-
वाकरेतील शुभांगी चौगले यांची भावना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः ‘बारावीची परीक्षा दिली आणि लग्न ठरले. आठच दिवसांत लग्न समारंभही झाला. लग्नानंतर शिक्षण पूर्ण करता येईल का, अशी धाकधूक मनात होतीच. मी विघ्नहर्ता बाप्पाजवळ मनोमन प्रार्थना केली की माझ्या शिक्षणात खंड पडू नये. माझी इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करीत असे. सासर असे दिले की शिक्षणाची आवड होती आणि त्या कुटुंबाने मुलगी मानून पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलेच. शिवाय, नोकरी करण्यासाठी आडकाठी केली नाही. शिक्षण होताच माझे गृहिणीपण गळून पडले. मात्र माझ्या सासू-सासरे, पती यांनीही तसे जाणवू दिले नाही. बाप्पाच्या आशीर्वादानेच मला शिक्षण पूर्ण करण्यासोबतच समाजासाठी कार्यरत असणारी नोकरीही मिळाली’, वाकरे (ता. करवीर) येथील शुभांगी चौगले बोलत होत्या आणि बुद्धीची देवता असणाऱ्या गणपती बाप्पाचे त्यांच्या मनातील निर्गुण रूप साकार होत होते.
चौगले यांचे माहेर म्हालसवडे. लग्नानंतर त्या एकत्रित कुटुंबात आल्या. घरच्या शेतीवर पोसल्या जाणारी १८ जनावरे. अशा गोतावळ्यात त्यांना वर्षभरातच नव्या पाहुण्याची चाहूल लागली आणि पुत्ररत्नाने जन्म घेतला. पुढच्या तीन वर्षांत शुभांगी यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली. तोपर्यंत मुलगाही तीन वर्षांचा झाला. त्यानंतर त्यांचे पती तानाजी यांनी त्यांना एमएसडब्ल्यू करण्याचा सल्ला दिला. सायबर महाविद्यालयातून त्यांनी सामाजिक कार्यातील पदवी घेतली. दररोजचे लेक्चर्स आणि फिल्डवर्क अशा धावपळीत चिरंजिव धैर्यशीलला सांभाळण्याची जबाबदारी घरच्यांनी पेलली. पदवी घेतल्यानंतर लगेचच त्यांना बालकल्याण संकुलमध्ये क्लार्कची नोकरीही मिळाली. या काळात पीडित महिलांचे समुपदेशन करण्याची जबाबदारी त्यांनी लिलया पेलली. याचदरम्यान त्यांना कागल येथील जीवनदान महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून अधीक्षक पदावर काम करण्याची संधी आली. आणि त्या या संस्थेत अधीक्षक पदावर रुजू झाल्या. त्या इतर सामाजिक संस्थांसोबतही काम करतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असणाऱ्या माया केअर फाउंडेशनच्या माध्यमातून त्या मोफत सेवा देतात. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे समुपदेशन करतात. त्यांच्या या सामाजिक कार्य आणि व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे राबविल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र प्रशिक्षण व्यवसाय संस्थेतर्फे राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिवाय जिल्हा सहकारी बँकेतर्फे ताराई पुरस्कारानेही गौरविले आहे.
शिक्षण, कुटुंब, सामाजिक कार्यात मला वेळ देता आला ही विघ्नहर्ता बाप्पाची कृपा असल्याची भावना शुभांगी चौगले यांनी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94222 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..