कुठे काय पहाल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुठे काय पहाल?
कुठे काय पहाल?

कुठे काय पहाल?

sakal_logo
By

कोठे काय पाहाल?
यंदा गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होत असून, देखाव्यांनाही आता मोठी गर्दी होत आहे. कलात्मक मूर्ती, काल्पनिक मंदिरांच्या प्रतिकृती, प्रबोधनपर देखाव्यांबरोबरच ऐतिहासिक सजीव देखाव्यांवरही यंदा मंडळांनी भर दिला आहे. शहरात कुठे काय पाहाल, याविषयीचा हा धांडोळा...
...............
- महापालिका, जुना बुधवार पेठ
*छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ ः एकवीस फुटी महागणपती
* काळाईमाम तालीम ः पावनखिंडीचा रणसंग्राम
* सम्राट चौक मित्रमंडळ- चिंतामणी दरबार
* जुना बुधवार तालीम मंडळ- २५ फूट सिंहासनारूढ गणेशमूर्ती
* नरसोबा सेवा मंडळ- रामसेतू देखावा
* नुक्कड तरुण मंडळ- बालगणेश पैलवान रूपातील मूर्ती
* सोल्जर्स ग्रुप- राजर्षी शाहू क्रांती गौरवावर आधारित तांत्रिक देखावा
* डांगे गल्ली तरुण मंडळ- पैलवान रूपातील गणेशमूर्ती व राजर्षी शाहू जीवनपटावर आधारित माहितीफलक
* क्रांतिवीर राजगुरू तरुण मंडळ- विष्णू रूपातील गणेशमूर्ती
* टेक्सास तरुण मंडळ- बालगणेश मूर्ती
* हाय कमांडो फ्रेंडस्‌ सर्कल- ‘मतदानच करा, विकू नका’ विषयावर तांत्रिक देखावा
...............
- शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, रविवार पेठ
* व्‍हिनस कॉर्नर मित्रमंडळ ः आकर्षक मूर्ती व सजावट
* त्रिमूर्ती मित्र मंडळ ः ‘भविष्याचा कचरा’ प्रबोधनपर देखावा
* शाहूपुरी पहिली गल्ली ः शाहूपुरी युवक मंडळ-राजर्षी शाहूंची हत्तीवरून मिरवणूक देखावा
* शाहूपुरी दुसरी गल्ली ः राधाकृष्ण तरुण मंडळ- कलात्मक मंदिर रोषणाई
* शाहूपुरी तिसरी गल्ली ः गरुड लेणी देखावा
* व्यापारी पेठ ः शाहूपुरी भाजीपाला मंडई मित्रमंडळ-आकर्षक गणेशमूर्ती
* शाहूपुरी पाचवी गल्ली ः मराठायोद्धा फ्रेंड सर्कल- श्री गणरायाप्रति वंदन करणारे मूषक
* शिवनेरी मित्रमंडळ ः मोफत फन ॲण्ड फेअर, खेळांचा आनंद
* शाहूपुरी पाच बंगला मंडळ- आरक्षण मूर्ती निसर्ग सजावट
* लक्ष्मीपुरी ः शिवशक्ती तरुण मंडळ- आकर्षक गणेशमूर्ती
* शिवशाही तरुण मंडळ ः एकवीस फुटी कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मूर्ती
* स्वयंभू गणेश मित्र मंडळ ः गजारूढ आकर्षक मूर्ती
* सत्यनारायण मित्र मंडळ ः आकर्षक गणेशमूर्ती
* गाईड मित्र मंडळ ः नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या रूपातील मूर्ती
* पूलगल्ली तालीम ः एकवीस फुटी सिद्धिविनायक रूपातील आकर्षक मूर्ती
* सर्वोदय मित्रमंडळ ः ‘आरोग्यम धनसंपदा’ तांत्रिक देखावा
...........
- मंगळवार पेठ, शिवाजी पेठ
* लेटेस्ट तरुण मंडळ ः जालियनवाला बाग हत्याकांड सजीव देखावा
* राधाकृष्ण भक्त मंडळ ः सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारी कलात्मक मूर्ती
* टायगर मित्रमंडळ, साठमारी गल्ली ः २३ फुटी भव्य मगरीची प्रतिकृती
* श्री तरुण मंडळ (कोष्टी गल्ली क्रमांक २) ः काल्पनिक मंदिराची प्रतिकृती
* स्वस्तिक तरुण मंडळ (कोष्टी गल्ली क्रमांक १) ः ‘विठू माझा लेकुरवाळा’ तांत्रिक देखावा
* मित्रप्रेम मित्रमंडळ (कपिलतीर्थ) ः ‘होय संभाजीनगरच’ ऐतिहासिक सजीव देखावा
* गोल्डस्टार स्पोर्टस् असोसिएशन ः वीर शिवा काशीद सजीव देखावा
*(कै.) उमेश कांदेकर युवा मंच (रंकाळा टॉवर) ः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सजीव देखावा
..............
- शिवाजी उद्यमनगर
* जय शिवराय मित्रमंडळ ः राजर्षी शाहू आणि राधानगरी धरण देखावा
* मदनलाल धिंग्रा तरुण मंडळ ः एकवीस फुटी ऑक्टोपस तांत्रिक देखावा
* मनोरंजन मंडळ प्रणित धर्मवीर मंडळ ः थ्रीडी गणेशमूर्ती
* शांतिदूत कला, क्रीडा मंडळ ः भारतीय नौ सेना छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरित नवीन ध्वजाचा तांत्रिक देखावा
..................
- राजारामपुरी परिसर
​*दुसरी गल्ली ः शिवाजी तरुण मंडळ- बाहुबली सेट
*तिसरी गल्ली ः राजारामपुरी स्पोर्टस्‌- राजमहाल सेट
*चौथी गल्ली ः जय मराठा मंडळ- हनुमान तांत्रिक देखावा
*पाचवी गल्ली ः विवेकानंद मित्र मंडळ- सजीव देखावा
*सहावी गल्ली ः शिवप्रेमी मित्रमंडळ- अमरनाथ गुफा
*सहावी गल्ली ः जय शिवराय तरुण मंडळ- श्रीकृष्ण जन्मकथा (तांत्रिक देखावा)
*सातवी गल्ली ः न्यू फ्रेंडस्‌ सर्कल- इस्त्रो यान (तांत्रिक देखावा)
​*दहावी गल्ली ः इंद्रप्रस्थ तरुण मंडळ- राजदरबार प्रतिकृती
*अकरावी गल्ली ः युवक मित्रमंडळ- कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांवर भाष्य करणारा देखावा ​
...........
- कसबा बावडा परिसर
*छत्रपती शिवाजीराजे मित्रमंडळ, पाटील गल्ली- सध्‍याच्या राजकीय घडामोडींवर आधारित ‘छत्रपती शासन''
*भारतवीर मित्रमंडळ- चौगले गल्ली- सुख म्हणजे नक्की काय- दिव्यांगांवर आधारित
*सस्पेन्स स्पोर्टस्‌- आडवी गल्ली- मुंबईचा राजा मूर्ती
*जय शिवराय मित्रमंडळ- ठोंबरे गल्ली- छत्रपती संभाजी महाराज- गड किल्ल्यांसाठी छत्रपतींचे काम
*बिल्वदल मित्रमंडळ- रणदिवे गल्ली- रायनासोर- तांत्रिक देखावा
*झेंडा चौक मित्रमंडळ- कागलवाडी- कोंडाजी फर्जंद- ऐतिहासिक देखावा
*शिवाजी तरुण मंडळ - वाडकर गल्ली- प्रदूषणावर प्रकाशझोत टाकणारा देखावा
*सम्राट मित्रमंडळ- चव्हाण गल्ली- केदारनाथ मंदिराची प्रतिकृती
*सावरकर कला-क्रीडा मंडळ- संकपाळनगर- रावणाचा वध करणारी गणेशमूर्ती
*मनोरंजन तरुण मंडळ- वाडकर गल्ली- श्री संत बाळूमामा- धार्मिक देखावा
*स्वस्तिक तरुण मंडळ- तालीम चौक- चित्ती असावे समाधान- बहीण-भावाच्या संबंधावर आधारित
*ॲम्बोज ग्रुप- भगतसिंग वसाहत- वटपौर्णिमेचा देखावा
*अजिंक्यतारा मित्रमंडळ- अजिंक्यतारा कॉलनी- भुताची गुहा
*अण्णा भाऊ साठे मंडळ- भगतसिंग वसाहत- बैलगाडी शर्यतीतील थरार- तांत्रिक देखावा
*भैरवनाथ कला-क्रीडा मंडळ- पोवार मळा- अमरनाथ मंदिराची प्रतिकृती
............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94246 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..