माकपतर्फे मंगळवारी इचलकरंजीत मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माकपतर्फे मंगळवारी इचलकरंजीत मोर्चा
माकपतर्फे मंगळवारी इचलकरंजीत मोर्चा

माकपतर्फे मंगळवारी इचलकरंजीत मोर्चा

sakal_logo
By

माकपतर्फे मंगळवारी इचलकरंजीत मोर्चा
इचलकरंजी, ता. ७ : दारिद्र्यरेषेची उत्पन्नमर्यादा वार्षिक दोन लाख रुपये व्हावी, तसेच सध्या मिळणारे रेशन सुरू राहावे, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने इचलकरंजीमध्ये मंगळवारी (ता. १३) पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शहर सचिव भरमा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिधापत्रिकांची तपासणी करून अपात्र आढळून आलेल्या लाभार्थ्यांचे धान्य कमी करण्याचा अध्यादेश विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्रसारित केला आहे. यामध्ये साठ हजारांपेक्षा अधिक उत्पन्न, इन्कमटॅक्स खाते, स्लॅबचे घर असल्यास मिळणारे रेशन बंद करण्यात येणार आहे. यास विरोध दर्शविण्यासाठी पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ कामगार नेते दत्ता माने, प्राचार्य ए. बी. पाटील म्हणाले, ‘‘रेशन दुकानांमधून धान्य मिळणे बंद झाले तर खुल्या बाजारातील धान्यदर वाढण्याचा धोका आहे. सरकारने कष्टकरी आणि यंत्रमाग कामगारांची बाजू समजावून घ्यावी. आमदार खासदाराची पेन्शन बंद करावी. झोपडपट्टीधारकांना स्लॅबचे घर आणि नोकरी द्यावी, त्याविना रेशन बंद करू नये, अन्यथा मोर्चानंतर ही पक्षातर्फे उग्र आंदोलन करावे लागेल.’’ जीवन कोळी, सदा मलाबादे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94253 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..