अनुसूचितच्या कमांवर ऑनलाईन लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुसूचितच्या कमांवर ऑनलाईन लक्ष
अनुसूचितच्या कमांवर ऑनलाईन लक्ष

अनुसूचितच्या कमांवर ऑनलाईन लक्ष

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद फोटो

अनुसूचितच्या कमांवर ऑनलाईन लक्ष
बांधकाम समितीत सूचना; कामाच्या नियंत्रणासाठी सॉफ्‍टेवअरचा वापर
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ७ : समाजकल्याण विभागाकडून अनुसूचित जाती, जमातीच्या वस्‍त विविध विकासकामे केली जात आहेत. मात्र अनेक वस्‍त्यांच्या बाहेर ही कामे सुरू आहेत. या ठिकाणी बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या वस्‍तीत जाऊन जीओटॅगिंग करण्यात येणार आहे. यासाठी शाखा अभियंता, सरपंच, ग्रामसेवकांनी त्या ठिकाणी उपस्‍थित राहावे व या कामांची प्रत्येक टप्‍प्यावर तपासणी करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांनी केली. दरम्यान, मुख्यालयात स्‍वच्‍छता नसल्याबद्दल बांधकामच्या अधिकाऱ्यां‍ची कानउघाडणी केली.

ऑनलाईनद्‌वारे बुधवारी (ता. ७) बांधकामच्या बैठकीचे आयोजन केले होते. यात अनुसूचित वस्‍तीत होणाऱ्या‍ कामांत गावस्‍तरावर परस्‍पर बदल होत असल्याचे जिल्‍हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी सांगितले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्‍हाण यांनी बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यां‍चा क्‍लासच घेतला. कामांची मंजुरी, त्यावरील देखरेख, कामात परस्‍पर होणाऱ्या बदलांपासून ते मोजमाप पुस्‍तिकापर्यंत चर्चा केली. येथून पुढे कामाची लाईन आउट देताना ज्या ठिकाणी काम होणार आहे, त्या ठिकाणी सरपंच व ग्रामसेवकांना उभे करून जिओटॅगिंग करून ती माहिती सॉफ्‍टवेअरवर अपलोड करावी, अशी सूचना श्री. चव्‍हाण यांनी केली.
बांधकामच्या उपअभियंत्यांनी कामाच्या प्रशासकीय मान्यतेबाबत काही प्रश्‍‍न उपस्‍थित केले. अनुसूचितच्या कामांची प्रशासकीय मान्यता अगोदर येते व नंतर अंदाजपत्रक केले जाते. ही प्रक्रिया चुकीची असून यात बदल करण्याची सूचना केली. यावर संबंधित गावातील वस्‍तीचा प्रस्‍ताव घेणे, गट विकास अधिकाऱ्यांनी
तो तपासणे, त्यानंतर जिल्‍हा समाजकल्याण अधिकाऱ्यांनी तो पडताळून समाजकल्याण समितीस सादर करणे, मंजूर प्रस्‍तावानुसार अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता देणे, याचपद्धतीने पुढील नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

कोट
अनुसूचित वस्‍तीच्या विकासकामांचे सॉफ्‍टवेअर राज्यात पहिल्यांदा कोल्‍हापूर जिल्‍हा परिषदेने तयार केले असून त्याचा राज्यात वापर होत आहे. यात जिल्‍ह्यातील सर्व अनुसूचित वस्‍तींची यादी, त्यांना बृहत आराखड्याप्रमाणे मंजूर निधी, आत्तापर्यंत दिलेला निधी, मंजूर कामे, कामाचे ठिकाण तसेच दाखल प्रस्‍तावाचा सर्व प्रवास, कामांचे अद्ययावत फोटो अपलोड केले जाणार आहेत. यामुळे दुबार कामे होणार नसून कामांची प्रगतीही लगेच समजणार आहे.
- दीपक घाटे, जिल्‍हा समाजकल्याण अधिकारी
...
औषधे खरेदीचा ठराव
बांधकाम समितीसह आज स्‍थायी समितीचेही आयोजन केले होते. यात केवळ आरोग्य विभागाच्या औषध खरेदीवर चर्चा केली. या औषधासाठी जिल्‍हा नियोजन मंडळाने तरतूद केली आहे. मात्र सध्या नियोजनच्या खर्चावर निर्बंध आहेत. मात्र आरोग्य हे अत्यावशक सेवेत असल्याने व पशुसंवर्धन विभागानेही औषध खरेदी केली असल्याने त्याच आधारावर आरोग्य विभागाने औषधे खरेदी करण्याचा ठराव केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94271 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..