आजऱ्याची वहुसांस्कृतिक परंपरा टिकवा : राजीव नवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्याची वहुसांस्कृतिक परंपरा टिकवा : राजीव नवले
आजऱ्याची वहुसांस्कृतिक परंपरा टिकवा : राजीव नवले

आजऱ्याची वहुसांस्कृतिक परंपरा टिकवा : राजीव नवले

sakal_logo
By

48769
आजरा : येथे मार्गदर्शन करताना पोलिस उपाधीक्षक राजीव नवले. या वेळी तहसीलदार विकास अहिर, प्रभारी गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे व मान्यवर.

आजऱ्याची बहुसांस्कृतिक
परंपरा टिकवा : राजीव नवले
आजरा, ता. ८ : कायदा-सुव्यवस्था टिकावी जशी प्रशासनाची जबाबदारी आहे. त्याच पद्धतीने एक सुजाण नागरिक म्हणून सर्वच नागरिकांचे उत्तरदायित्व आहे. गणेशोत्सव हा मांगल्याचा व चैतन्याचा सण आहे. तो आनंदात व उत्साहात साजरा व्हावा, त्याचबरोबर या सणात विसर्जन मिरवणुकामध्ये कोणतेही गालबोट लागू नये, याचे भान सर्व तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवावे. आजरा शहराची बहुसांस्कृतिक परंपरा टिकवावी, असे आवाहन गडहिंग्लज पोलिस उपाधीक्षक राजीव नवले यांनी केले.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये अनंत चतुर्दशीच्या पार्श्‍वभूमीवर शांतता समिती सदस्य व गणेशोत्सव तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या वेळी नवले यांनी मार्गदर्शन केले. तहसीलदार विकास अहिर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रभारी गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे प्रमुख उपस्थित होते.
नवले म्हणाले, ‘‘उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आवाजाबाबत जे नियम व अटी घातल्या आहेत, त्याचे पालन सर्वच तरुण मंडळांनी करावे. त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये वेळेचे बंधन पाळावे. मिरवणुकांमध्ये कोणतेही गालबोट लागू नये व पोलिसांना कठोर कारवाई करायला लागू नये, याची दक्षता घ्यावी.’’
बाळासाहेब इंगळे, अजित हरेर, उमेश पारपोलकर, सचिन इंदलकर, शंकर टोपले यांनी सूचना मांडल्या. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवावेत, विजेची व्यवस्था करावी यांसह विविध सूचना मंडळाच्या प्रतिनिधींनी केल्या. या वेळी ‘महावितरण’चे उपकार्यकारी अभियंता दयानंद कमतगी, नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी राकेश चौगुले, आजरा आगाराचे प्रभारी प्रमुख पृथ्वीराज, पंचायत समितीचे माजी सदस्य बशीर खेडेकर, अमित खेडेकर, किशोर म्हापसेकर, महेश पाटील, मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला. सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी स्वागत व आभार मानले. गुप्तचर विभागाचे अंमलदार अनिल तराळ यांनी संयोजन केले.
---------------
आजरा शहरात विविध धर्म व जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. ही ओळख जपण्याचा प्रयत्न कायम राहिला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात हीच परंपरा जोपासावी.
- विकास अहिर, तहसीलदार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94273 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..