क्रांतीवीर नाईक यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रांतीवीर नाईक यांना अभिवादन
क्रांतीवीर नाईक यांना अभिवादन

क्रांतीवीर नाईक यांना अभिवादन

sakal_logo
By

48767
गडहिंग्लज : उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी सामानगडावरून आणलेली ज्योत आणि मोटारसायकल रॅलीचे शहरात स्वागत करण्यात आले.

क्रांतिवीर नाईक यांना अभिवादन
---
सामानगडावरून ज्योत; मोटारसायकल रॅलीचेही आयोजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : गडहिंग्लज तालुका बेरड आणि नाईक समाजातर्फे आज आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची २३१ वी जयंती विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली. दहा ते बारा गावांतील तरुणांनी किल्ले सामानगडावरून ज्योत आणली. त्याबरोबर मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली. दरम्यान, शहरात दसरा चौकातील छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
किल्ले सामानगडावर पहाटे तरुण पोचले. तेथे पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्या हस्ते ज्योत पेटवून रॅलीचे उद्‍घाटन झाले. तेथून ज्योत व रॅली भडगावात आली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर श्रीशैल पाटील व भीमराव पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. या वेळी भीमराव पट्टणकुडी, अर्चना पट्टणकुडी, दयानंद पट्टणकुडी, वसंत नाईक, रविराज चिलमी, विजय नाईक, महेश नाईक, युवराज पट्टणकुडी, केंपाण्णा कतगार, विठ्ठल नाईक, राजेंद्र पाटील, संतोष नाईक, सूरज चिलमी, उमेश नाईक, महेश कांबळे, जावेद मुल्ला, राजू चौगुले आदी उपस्थित होते.
भडगावमधून रॅली गडहिंग्लजच्या दसरा चौकात आली. त्याठिकाणी माजी उपनगराध्यक्ष महेश ऊर्फ बंटी कोरी, जगदीश पाटील व बाळेश नाईक यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. नाईक, कोरी व राजू नाईक यांनी उमाजी नाईक यांच्या कार्याला उजाळा दिला. या रॅलीत भडगावसह दुंडगे, मुत्नाळ, खणदाळ, बसर्गे, तेरणी, कळवीकट्टे, बुगडीकट्टे, चन्नेकुप्पी, जरळी, हरळी, कडलगे, अरळगुंडी आदी गावांतील २०० हून अधिक तरुण सहभागी झाले होते. विविध गावांमध्ये रॅली व ज्योतीचे स्वागत झाले. बसर्गे येथे रॅलीची सांगता झाली. तालुक्याच्या विविध गावांना भेटी देत ३५ ते ४० किलोमीटर अंतर ज्योत घेऊन तरुणांनी दौड केली. रॅलीद्वारे गावागावांत उमाजी नाईक यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94277 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..