उंच मुर्ती बसविण्यावर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उंच मुर्ती बसविण्यावर भर
उंच मुर्ती बसविण्यावर भर

उंच मुर्ती बसविण्यावर भर

sakal_logo
By

उंच मूर्ती बसविण्यावर भर
हालत्या देखाव्यांची परंपरा कायम; सामाजिक संदेश, संस्कृतीचे दर्शन

इचलकरंजी, ता. ७ : यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उंच व प्रबोधनात्मक गणेशमूर्ती बसवण्यावर भर दिला आहे. मोजक्याच मंडळांनी आपली परंपरा कायम राखत हालते देखावे सादर केले आहेत. यातून संस्कृतीचे दर्शन घडवण्याबरोबरच सामाजिक संदेश दिले आहेत. घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर दोन दिवस देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
दोन वर्षानंतर शासनाकडून गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह वाढला आहे. मंडपासमोर दररोज विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. लोकसंस्कृती जोपासण्यात येत आहे. महाप्रसादासह सामाजिक उपक्रम घेण्यात येत आहेत. राजकीय नेतेमंडळींची मंडळांच्या आरतीसाठी उपस्‍थित राहण्यासाठी तारांबळ उडाली आहे. विसर्जनाची जंगी तयारी करण्यासाठी आतापासूनच कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.
दुसरीकडे यंदाही अनेक मंडळांनी उंच आकर्षक गणेशमूर्ती उभारण्यावर भर दिला आहे. ८ ते २१ फुटांपर्यंत विविध रुपातील आकर्षक गणेश मूर्ती बसवल्या आहेत. मंडळांनी आपली परंपरा कायम राखत भव्य-दिव्य असे यांत्रिक हालते देखावे बसवले आहेत. देखावे पाहण्यासाठी जथ्थेच्या जथ्थे सांयकाळी सात वाजल्यानंतर बाहेर पडत आहेत. त्यामुळे रस्ते गर्दीने फुलून जात आहेत. गावभाग परिसरात तर जत्रेचे स्वरुप आले आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिकांची वर्दळ वाढत असून ग्रामीण परिसरातील नागरिकही वाहनाने एकत्र येऊन देखावे पाहण्याचा आनंद लुटत आहेत. यंदा सजीव देखावे मात्र घटले आहेत.
-----
खवय्येगिरीसह खरेदीला उधाण
घोरपडे नाट्यगृह चौकात मनोरंजनाची खेळणी आली आहेत. येथे सांयकाळनंतर गर्दी होत आहे. खेळण्यांमध्ये बसण्याचा आनंद सर्वच वयोगटातील नागरिक घेत आहेत. विविध स्टॉल लागले असून खरेदीसह अनेक खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची लगबग सुरू आहे.
-----
कोठे, काय पहाल?
(हालते देखावे)
* गांधी कॅम्प - कुंभकर्ण
* सरस्वती मार्केट - अनाजी पंत वध
* कलानगर - महागणपती मंदिर
* सुर्वे मळा - सासन काठी
* लक्ष्मी प्रोसेस - मुलींचे झांज पथक
* घोडकेनगर - वारकरी सांप्रदाय

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94285 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..