कोरीवडेत लोककलेचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरीवडेत लोककलेचे दर्शन
कोरीवडेत लोककलेचे दर्शन

कोरीवडेत लोककलेचे दर्शन

sakal_logo
By

48804
कोरिवडे (ता. आजरा) : लोककला सादर करताना कलाकार नेताजी पाटील.

कोरिवडेत लोककलेचे जागर
स्थानिक कलाकारांचा सहभाग; भारूड, गोंधळासह अन्य प्रकार सादर
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ८ : कोरिवडे (ता. आजरा) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोरिवडे या मंडळाने सोंगी भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मंडळातील स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या लोककला पाहून ग्रामस्थ मंत्रमुंग्ध झाले. सुमारे तीन तास ग्रामस्थांना खुर्चीला खिळवून ठेवले.
यंदा कोरोनाचे सावट दूर झाल्यामुळे कोरिवडेत सोंगी भजनाचा कार्यक्रम गणेशोत्सवानिमित्त करण्यात आला. गेले दोन वर्ष ही परंपरा कोरोनामुळे खंडित झाली होती. यंदा हा कार्यक्रम उत्साहात झाला. सोहळ्यात सोंगी भजन हे खास आकर्षणचा विषय ठरले. स्थानिक कलाकरांचा अभिनय पाहून उपस्थित रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
भारूड, झिम्मा-फुगडी, कीर्तन, गोंधळ गीत, गौरीची गाणी, नंदी बैल, कडक लक्ष्मी, जोशी, पिंगळा, वासुदेव, पोतराज, भराडी, वाघ्यामुरळी यांसह लोककला लोप पावत चालल्या आहेत. याला उजाळा देण्याचे काम मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले. स्थानिक कलाकारांच्या मदतीने या लोककला सादर केल्या. यामुळे ग्राम संस्कृतीमधील अनेक गोष्टी उलघडल्या. कलाकार दिगंबर पाटील, नेताजी पाटील, रमेश पाटील, बाजीराव पाटील (गुरुजी) रामा कांबळे, बाबासो पाटील, कुंडलिक मिसाळ, गणपती गुरव, वसंत पाटील, लिंगनाथ पाटील यांनी सादर केली. यशवंत धोंडीबा पाटील, रवी कांबळे संगीत साथ दिली. या वेळी सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळे एकत्र येऊन एक गाव-एक गणपती ही संकल्पना आजही या गावात राबविली जात आहे. याबाबत कलाकार
--------------
कोट
गेली शेकडो वर्ष लोककला आपल्याला आनंद देत आली आहे. याचा समृद्ध वारसा लाभला आहे. ही लोककला उत्स्फूर्त असून ती प्रबोधनाचे कामही करते. यातून समाज बांधला जात होता. या परंपरेला उजाळा देण्याबरोबर ती पुढेही जोपासण्याचे काम आम्ही करणार आहोत.
- नेताजी पाटील, कलाकार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94286 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..