गडहिंग्लजला उद्या एकेरी वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला उद्या एकेरी वाहतूक
गडहिंग्लजला उद्या एकेरी वाहतूक

गडहिंग्लजला उद्या एकेरी वाहतूक

sakal_logo
By

गडहिंग्लजला उद्या एकेरी वाहतूक
---
विसर्जन मिरवणुकीमुळे निर्णय; बारा तास अंमलबजावणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : शुक्रवारी (ता. ९) अनंत चतुर्दशीनिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन आहे. यादिवशी श्री गणेशमूर्ती मिरवणुका निघणार असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी एकेरी वाहतुकीचे नियोजन केले. शुक्रवारी दुपारी तीन ते शनिवारी (ता. १०) मध्यरात्री दोनपर्यंत त्याची अंमलबजावणी होणार आहे.
शहरात ३० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. या मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका बहुतांश दुपारपासून सुरू होतात. यामुळे शुक्रवारी दुपारपासून एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. दसरा चौक, मुसळे तिकटी, वीरशैव चौक, बाजारपेठ, नेहरू चौक, शिवाजी चौक, नदीवेस असा मिरवणुकीचा मार्ग राहील. या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी संकेश्‍वरकडून आणि आजरा, चंदगडकडून येणाऱ्या वाहतुकीचे नियोजन पर्यायी मार्गाने केले आहे.

असा राहील एकेरी मार्ग
- संकेश्‍वरकडून गडहिंग्लज, आजरा, चंदगडकडे येणारी वाहतूक महिंद्र शोरूम, कंपोस्ट डेपो, मेटाचा मार्ग, सोलापुरे वसाहत, शेंद्री रोडवरील आयटीआय, काळभैरव कमान, मारुती मंदिर ते बीएसएनएल कार्यालयमार्गे एमआर हायस्कूलजवळून नवीन कोर्ट, भगवा चौकातून शानबाग हॉस्पिटल येथून चंदगड-आजऱ्याकडे वळविण्यात आली आहे.
- गडहिंग्लज, आजरा, चंदगडकडून संकेश्‍वरकडे जाणारी वाहतूक चर्च रोड, भगवा चौक, एम. आर. हायस्कूलजवळून बीएसएनएल कार्यालय, हनुमान मंदिर, काळभैरी रोड, शेंद्री रोड, वारणा दूध संघासमोरील औरनाळ रस्ता, औरनाळ फाटा ते संकेश्‍वर रोड अशी वळविण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94327 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..