पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

ढोलगरवाडीच्या एकास
वीज चोरीबद्दल वर्षाची कैद

गडहिंग्लज, ता. ७ : वीज महावितरण कंपनीची फसवणूक करून वीज चोरी केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने भाऊराव संभाजी पाटील (ढोलगरवाडी, ता. चंदगड) यास दोन वेगवेगळ्या कलमान्वये प्रत्येकी एक वर्ष साधी कैद व दहा हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिना साधी कैद दिली आहे. दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगावयाच्या आहेत. येथील विशेष जिल्हा न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे अ‍ॅड. एस. ए. तेली यांनी काम पाहिले.
याबाबतची माहिती अशी, श्री. पाटील हा वीज कंपनीच्या मीटरमध्ये छेडछाड करून २२ फेब्रुवारी २०१४ ते १९ नोव्हेंबर २०१५ या दरम्यान सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीची वीज चोरी केल्याची फिर्याद फिरत्या पथकाचे कार्यकारी अभियंता अमित बोकील यांनी दिली होती. त्यानुसार पाटील याच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याने गुन्हा दाखल केला होता. त्याची तपासणी करून पोलिसांनी पाटील याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी येथील जिल्हा न्यायालयात सुरू होती. सरकारी वकील अ‍ॅड. एस. ए. तेली यांनी सुनावणी दरम्यान सात साक्षीदारांची तपासणी केली. अ‍ॅड. तेली यांचा युक्तिवाद आणि सबळ पुरावा ग्राह्य मानून न्या. देशमुख यांनी पाटील यास ही शिक्षा दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94338 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..