महापालिका तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका तयारी
महापालिका तयारी

महापालिका तयारी

sakal_logo
By

महापालिकेकडून तयारी सुरू
कोल्हापूर, ता. ७ ः अनंत चतुर्दशीनिमित्त शुक्रवारी (ता. ९) होणाऱ्या सार्वजनिक गणेश विर्सजन मिरवणुकीसाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. मार्गावर बॅरिकेडस्‌ उभी करण्याबरोबरच विविध अडथळे दूर करून इराणी खणीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. सहभागी सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांच्या अध्यक्षांना पापाची तिकटी येथे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते श्रीफळ, पान-सुपारी देण्यात येणार आहे. रोपेही भेट दिली जाणार आहेत.
महापालिकेच्या पवडी विभागाचे २२५ कर्मचारी, आरोग्य व ड्रेनेज विभागाचे ६५०, ४३० हमालांसह ९० टेम्पो, १० डंपर, २४ ट्रॅक्टर-ट्रॉली, ५ जेसीबी, ७ पाण्याचे टँकर, २ रोलर, २ बुम अशी यंत्रणा सज्ज केली आहे. मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची डागडुजी युद्ध पातळीवर सुरू आहे. विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबूचे व आवश्यकतेनुसार लोखंडी बॅरिकेडस्‌ व वॉच टॉवर उभे करण्यात येत आहेत. अडथळे व अतिक्रमण काढण्यात येत आहेत. झाडांच्या फांद्याही छाटल्या आहेत. मिरवणूक मार्ग व विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था केली आहे. पंचगंगा नदी घाट, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव, पंचगंगा नदी बापट कॅम्प येथे अर्पण करण्यात येणाऱ्या मूर्ती संकलनाकरिता मंडप उभारला आहे. इराणी खाणीवर सार्वजनिक मूर्ती विर्सजनासाठी दोन जेसीबी ठेवले आहेत. इराणी व बाजूच्या खाणीभोवती बॅरिकेडिंग केले आहे. वॉच टॉवर व पोलिसांसाठी मंडप उभे केले आहेत. इराणी खाणीवर साफसफाई केली असून, वैद्यकीय पथके नेमली आहेत. मूर्ती व निर्माल्य योग्य ठिकाणी पोहचविण्यासाठी वाहतूक व्यवस्था आहे. विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक साधनसामुग्रीसह तैनात असेल.

पार्किंगसाठी पर्यायी व्यवस्था
देखाव्यांमुळे राजारामपुरी मेन रोड रस्ता बंद केला आहे. पार्किंगसाठी राजारामपुरी ९ नंबर शाळा, शहाजी लॉ कॉलेजचे मैदान, व्ही. टी. पाटील भवनची जागा, शाहू मिल समोरील जागा, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदान, दसरा चौक ही ठिकाणे निश्‍चित केली आहेत. देखावे पाहण्यास येणाऱ्या नागरिकांनी वाहने येथे पार्किंग करावीत, असे आवाहन महापालिका व पोलिस प्रशासनाने केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94340 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..