धोकादायक इमारती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धोकादायक इमारती
धोकादायक इमारती

धोकादायक इमारती

sakal_logo
By

48839

धोकादायक इमारतीतील व्यवसाय ठेवणार बंद
महापालिकेतर्फे फलक लावण्यास सुरवात; बॅरिकेडस् उभारण्यात येणार

कोल्हापूर, ता. ७ ः विसर्जन मार्गावरील महाद्वार रोड, शिवाजी रोड, गंगावेश येथील २८ धोकादायक इमारतींवर महापालिकेने फलक लावण्यास सुरवात केली. काही इमारतींभोवती बॅरिकेडस् उभारण्यात येणार आहेत. तसेच त्यातील व्यवसाय ९ व १० तारखेला बंद ठेवण्यात येणार आहेत. रहिवाशांनाही अन्य ठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या आहेत.
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक इमारती आहेत. काही वर्षांपूर्वी अशाच इमारतीचा भाग कोसळून एकाला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे महापालिकेने अशा इमारतींसाठी सतत नोटिसा दिल्या आहेत. तसेच ज्या अतिधोकादायक आहेत, त्यांचा काही भाग पाडला आहे. त्यानंतरही अनेकजण त्या इमारतीत वास्तव्यास आहेत. त्यांच्या तसेच इतरांच्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणूण नोटीस देताना महापालिकेने चित्रीकरण करून ठेवले आहे. विसर्जन मिरवणूक मार्गातील महाद्वार रोडवरील २३, शिवाजी रोडवरील दोन, तर गंगावेश येथील ३ अशा २८ इमारती धोकादायक आहेत. त्यावर फलक लावण्यास आजपासून सुरवात केली. उपशहर अभियंता नारायण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्या-त्या भागातील अभियंत्यांकडून उद्याही फलक लावले जाणार आहेत. नागरिकांनी अशा इमारतीच्या परिसरात अगर इमारतीमध्ये प्रवेश करू नये, असेही आवाहन महापालिकेने केले आहे. याशिवाय परवाना विभागाला त्या इमारतीतील व्यवसाय ९ व १० तारखेला बंद ठेवावे, यासाठी सूचना दिल्या आहेत. ज्या रहिवाशांना अन्यत्र राहण्यास जागा नसेल, त्यांच्यासाठी निवारा केंद्र तयार ठेवले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94346 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..