कापडाची मागणी पूर्णतः ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कापडाची मागणी पूर्णतः ठप्प
कापडाची मागणी पूर्णतः ठप्प

कापडाची मागणी पूर्णतः ठप्प

sakal_logo
By

कापडाची मागणी पूर्णतः ठप्प
इचलकरंजीत वस्त्रोद्योगात अस्वस्थता; दसऱ्यानंतर सुधारण्याची आशा
इचलकरंजी, ता. ७ ः कापूस व सूत दरातील अस्थिरतेचा मोठा फटका कापड मागणीला बसला आहे. काही दिवसांपासून कापडाची मागणी पूर्णतः ठप्प आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगात अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामध्ये दसऱ्यानंतर चांगली सुधारणा होईल, अशी आशा तज्‍ज्ञ व्यक्त करीत आहेत.
काही महिन्यांपासून कापूस व सूत दरात अस्थिरता निर्माण झाली आहे. कापसाला यंदा उच्चांकी दर मिळाला होता. त्यामुळे सूतदरातही भरमसाठ वाढ झाली होती. त्यानंतर मात्र कापूस व सूतदरात घसरण सुरू झाली आहे. सध्या कापूस ८० ते ८५ हजाराच्या आसपास प्रती खंडी कापसाचा दर सुरू आहे. सूतामध्येही प्रतिकिलो तीन ते पाच रुपयांची घसरण सुरुच आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगात अस्थिरता निर्माण झाली आहे.
या परिस्थितीचा परिणाम कापडाला दर व मागणीही नाही. वस्त्रोद्योगातील उलाढाल ठप्प आहे. सूत दर स्थिर होणार नाहीत, तोपर्यंत परीस्थिती सुधारण्याची शक्यता कमी वाटत असल्याचे जाणकारांचे मत आहे. कापड व्यापारीही याकडेच लक्ष देऊन आहेत. त्यामुळे कापूस व सूत दरातील तेजी-मंदीचा फटका यंत्रमागधारकांना बसत आहे. यंत्रमाग सुरू ठेवायचे की बंद ठेवायचे, या मनःस्थितीत यंत्रमागधारक आहेत.
दसरा झाल्यानंतर या परिस्थीतीमध्ये काही अंशी सुधारणा होईल, अशी आशा आहे. दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे कापडाला मागणी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कापडाला योग्य दर येण्यासाठी दसऱ्यापर्यंत यंत्रमागधारकांना वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.
-----
कापसाची टंचाई भासणार
यंदा कापसाचे पीक चांगले आले होते. पण नुकत्याच झालेल्या पावसाचा फटका कापसाला बसला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या कापसावर त्याचा परिणाम होणार आहे. परिणामी, पुढील काळात कापसाचे दर पुन्हा वाढण्याची भीती जाणकारांतून व्यक्त होत आहे.
------
कापूस व सूत दरातील अस्थिरतेमुळे सध्या यंत्रमाग उद्योगातील उलाढाल ठप्प आहे. कापडाला मागणी व दर नाही. दसऱ्यानंतर परीस्थिती सुधारेल, अशी आशा आहे.
-विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94366 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..