साडेपाच लाख शेतकऱ्यांचे केवाएसी पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडेपाच लाख शेतकऱ्यांचे केवाएसी पूर्ण
साडेपाच लाख शेतकऱ्यांचे केवाएसी पूर्ण

साडेपाच लाख शेतकऱ्यांचे केवाएसी पूर्ण

sakal_logo
By

‘पीएम किसान’मध्ये साडेपाच लाख
शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण
कोल्हापूर, ता. ७ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील पाच लाख ६० हजार २६१ शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण केले आहेत. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याला आधार लिंक व मोबाईल क्रमांक जोडला जात आहे. यामुळे केंद्र सरकारकडून वर्षाला दिला जाणारा सहा हजारांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.
श्री. रेखावार म्हणाले, की शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली आहे. पात्र शेतकऱ्यांना पुढील लाभ देण्यासाठी शेतजमिनीविषयीची माहिती, खाते क्रमांक, गट क्रमांक, क्षेत्र, फेरफार या सर्वांची माहिती वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी केंद्र सरकारने ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार राज्य पाळीवर १९ ऑगस्ट २०२२ ला प्रशिक्षण दिले. तलाठी कार्यालयातील महसूल क्षेत्रीय यंत्रणेमार्फत हे काम सुरू होते. त्यानुसार २ सप्टेंबरपर्यंत तांत्रिक अडचणींचे निराकरण केले. जिल्ह्यातील सहा टक्के काम झाले होते. त्यामुळे, शेतकरी लाभापासून वंचित राहू नये यासाठी सुटीच्या दिवशीही महसूलच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी काम करीत १०० टक्के काम पूर्ण केले आहे. यात पाच लाख ६० हजार २६१ शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली आहे. दरम्यान, काही तांत्रिक कारणांमुळे अस्वीकृत झालेल्या डाटा दुरुस्तीचे काम जसजसे राज्यपातळीवरून कळविले जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94374 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..