महावीर अध्यासन देणगी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावीर अध्यासन देणगी बातमी
महावीर अध्यासन देणगी बातमी

महावीर अध्यासन देणगी बातमी

sakal_logo
By

48843

महावीर अध्यासनाला
अॅड. उपाध्ये यांची देणगी

कोल्हापूर, ता. ७ ः अॅड. अशोक तेजपाल उपाध्ये यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी दहा हजारांची देणगी दिली. त्यांच्या मातोश्री अनुसया यांच्या शताब्दी पूर्ततेच्या निमित्ताने त्यांनी अध्यासनाचे डॉ. विजय ककडे यांच्याकडे रक्कम दिली.
अॅड. उपाध्ये यांच्या कुटुंबीयांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्‍वाचा सहभाग होता. या त्यांच्या कार्याबद्दल भगवान महावीर अध्यासनातर्फे शाल, श्रीफळ व ग्रंथ देऊन त्यांच्या मातोश्रींचा विशेष सत्कार झाला. या वेळी भगवान महावीर अध्यासन सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. भगवान महावीर अध्यासन निधी संकलन अध्यक्ष व अर्थतज्‍ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, भगवान महावीर अध्यासनास १ लाखाची देणगी देणारे एन. एन. पाटील व त्यांच्या पत्नी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, दिगंबर जैन बोर्डिंगचे सुरेश रोटे, अनिल पाटील, प्रा. संदीप पाटील, उद्योजक सुरेश जैन, अॅड. किरण महाजन आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94379 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..