सुमती नागेशकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुमती नागेशकर यांचे निधन
सुमती नागेशकर यांचे निधन

सुमती नागेशकर यांचे निधन

sakal_logo
By

फोटो : 48845

सुमती नागेशकर यांचे निधन
कोल्हापूर : राजारामपुरीतील राजाराम रायफल्स कॉलनी येथील सुमती शंकरराव नागेशकर (वय ९१) यांचे निधन झाले. हॉटेल कॅसलचे मालक, कोल्हापूर हॉटेल असोसिएशनचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते उज्‍ज्वल नागेशकर यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) कसबा बावडा येथे आहे.
सुमती नागेशकर यांचा जन्म २७ मार्च १९३१ ला झाला. ईस्टर पॅटर्न शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर राजाराम महाविद्यालयातून त्यांनी प्राणीशास्त्रात बी. एस्‍सी. केले. त्यानंतर बी. टी. कॉलेजमध्ये बी. एड. पूर्ण केल्यावर इंदुमती राणी गृहिणी महाविद्यालयाच्‍या प्राचार्यपदाची धुरा सांभाळली. ताराराणी विद्यापीठ आणि नंतर सरस्वती इंग्लिश स्कूल गिरगाव मुंबई येथे प्राचार्य पदाची यशस्वी कारकिर्द पूर्ण केली. मुंबईनंतर कृष्णा सहकारी कारखान्यावर छत्रपती संभाजी विद्यालयात प्राचार्या म्हणून त्यांनी सेवा बजावली. २० वर्षांच्या कारकिर्दीत अनेक ग्रामीण गरजू, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या आयुष्याची जडणघडण केली. त्या एक आदर्श माता आणि शिक्षिका होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94396 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..