बोगरनाळ, मुत्नाळेंचे प्रयोग सर्वोत्कृष्ठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोगरनाळ, मुत्नाळेंचे प्रयोग सर्वोत्कृष्ठ
बोगरनाळ, मुत्नाळेंचे प्रयोग सर्वोत्कृष्ठ

बोगरनाळ, मुत्नाळेंचे प्रयोग सर्वोत्कृष्ठ

sakal_logo
By

48873
गडहिंग्लज : विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी प्रयोगांना बक्षीस वितरणप्रसंगी दादासाहेब लाड, जे. बी. बारदेस्कर, सचिन शिंदे, जी. एस. शिंदे, एन. बी. हालबागोळ आदी.

बोगरनाळ, मुत्नाळेंचे प्रयोग सर्वोत्कृष्ट
गडहिंग्लज विज्ञान प्रदर्शन; घुगरे, लोहार, कांबळेंच्या प्रयोगांचेही यश
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : येथील साधना प्रशालेत आयोजित ४९ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून तनुजा बोगरनाळ (शिवराय हायस्कूल, नंदनवाड) यांच्या आयओटी बेंड रोबोट, तर उच्च प्राथमिक गटात अपेक्षा मुत्नाळे (वि. मं. अरळगुंडी) यांच्या सोलर वॉटर बल्बचा विज्ञान प्रयोग सर्वोत्कृष्ट ठरले.
महेश घुगरे (वि. मं. कुमरी) यांच्या प्राथमिक अध्यापक निर्मिती गटातून गणित शिका खेळातून, सुनील लोहार (मुंगूरवाडी हायस्कूल कळवीकट्टी) यांच्या माध्यमिक अध्यापक निर्मिती गटातून माझी प्रयोगशाळा तर प्रयोगशाळा सहायक व परिचर गटातून सुभाष कांबळे (शिवाजी विद्यालय, महागाव) यांच्या प्रकाशिय उपकरणे या प्रयोगांनाही प्रथम क्रमांक मिळाला. इतर निकाल असा : माध्यमिक व उच्च माध्यमिक गट : मनीष भौमिक - अ केअर अप्लिकेशन (साधना ज्यु. कॉलेज गडहिंग्लज), अनिकेत जाधव-वन्यप्राणी व पक्षी शेतातून पळवून लावणारे यंत्र (माळ मारुती गिजवणे, हायस्कूल). उच्च प्राथमिक गट : दर्शन मोरे -बहुउद्देशीय पेरणी यंत्र (जागृती गडहिंग्लज), अनिरुद्ध देसाई-जंगली प्राणी पळवून लावणे (शिवाजी विद्यालय गडहिंग्लज), प्राथमिक अध्यापक निर्मित गट : श्रीमती पद्मश्री गुरव- मानवी शरीर व इंद्रिय संस्था (वि. मं. शिप्पूर), विजयकुमार पाटील - गणितीय लॅपटॉप (वि.मं. जखेवाडी).
साधनाचे सचिव जे. बी. बारदेस्कर यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात बक्षीस वितरण झाले. शिक्षण भारतीचे अध्यक्ष दादासाहेब लाड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. श्री. लाड, श्री. बारदेस्कर व परीक्षकांचा सत्कार झाला. पी. आर. बैरागी यांनी स्वागत केले. आर. एन. पटेल यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. गटशिक्षणाधिकारी एन. बी. हालबागोळ, प्राचार्य जी. एस. शिंदे, संजय भांदुगरे, नामदेव घोलप, राजेंद्र खोराटे, सचिन शिंदे, विजय चौगुले उपस्थित होते. जे. के. सोज व निलोफर शेख यांनी सूत्रसंचालन केले. साधनाचे संचालक अरविंद बारदेस्कर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94423 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..