डॉ. रियाज शमनजींचा रविवारी नागरी सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. रियाज शमनजींचा रविवारी नागरी सत्कार
डॉ. रियाज शमनजींचा रविवारी नागरी सत्कार

डॉ. रियाज शमनजींचा रविवारी नागरी सत्कार

sakal_logo
By

48937
रियाज शमनजी

डॉ. रियाज शमनजींचा
रविवारी नागरी सत्कार
गडहिंग्लज : शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. रियाज शमनजी यांचा रविवारी (ता. ११) वाढदिवस आहे. त्यानिमित्त डॉ. रियाज शमनजी वाढदिवस गौरव समितीतर्फे त्यांचा छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते दुपारी चार वाजता नागरी सत्कार आयोजित केला आहे. संकेश्‍वर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम होईल.
शमनजी यांनी खडतर परिस्थितीत नेसरी व गडहिंग्लजच्या ग्रामीण भागात कृषी, नर्सिंग, फार्मसी महाविद्यालय उभारले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव या कार्यक्रमात केला जाणार आहे. शिक्षणातील त्यांच्या कामामुळे त्यांना समाजभूषण पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. सच्चा शिवसैनिक म्हणूनही त्यांनी गडहिंग्लजच्या राजकीय क्षेत्रात अल्पावधीत आपला ठसा उमटविला आहे.
वाढदिवसानिमित्ताने शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला उजाळा देण्यात येणार आहे. कार्यक्रमास माजी आमदार संजय घाटगे, मुंबई महापालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष सदा परब, शिवसेनेचे उपनेते अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. गौरव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कंग्राळकर, सचिव सुलोचना रेडेकर, सदस्य मुरलीधर माळी, मुफासीरा बारगीर, ओमप्रकाश जाधव, आशिष कुंभार यांच्यासह शमनजी ग्रुपमधील सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94474 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..