न्यायाधिन बंदीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यायाधिन बंदीची आत्महत्या
न्यायाधिन बंदीची आत्महत्या

न्यायाधिन बंदीची आत्महत्या

sakal_logo
By

कळंबा कारागृहात आष्ट्यातील
न्यायाधीन बंदीची आत्महत्या
कोल्हापूर ः कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोका अंतर्गत कारवाईतील न्यायाधिन बंदीने गळफास घेऊन आत्महत्या केली. भरत बाळासाहेब घसघसे (वय ३०, रा. आष्टा, ता. वाळवा) असे त्याचे नाव आहे. काल पहाटे हा प्रकार उघडकीस आला. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, भरत घसघसे मोकांतर्गत गुन्ह्यात २०१९ पासून कळंबा कारागृहात न्यायाधिन बंदी होता. काल पहाटे त्याने सर्कल क्रमांक सातमधील विभक्त कोठडीतील शौचालयाच्या खिडकीस कापडी पट्टीने गळफास घेतला. हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आला. त्यांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविला. याबाबतची वर्दी प्रभारी अधीक्षक पांडुरंग भुसारे यांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आजऱ्यात कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम
आजरा ः आजरा तालुक्यात कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. 13 ते 20 सप्टेंबरअखेर ही मोहीम होईल. अभियानातंर्गत नागरिकांची कुष्ठरोगाविषयी तपासणी व संशयित क्षय रुग्ण शोधणे यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. तपासणीसाठी एक महिला व एक पुरुष स्वयंसेवक अशो दोन लोकांचे पथक घरोघरी लोकांची तपासणी होणार आहे. संशयित रुग्णाची वैद्यकिय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाणार आहे. नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी मोहिमेमध्ये सहभाग घेऊन तपासणीस येणाऱ्या सदस्यांना सहकार्य करावे असे आवाहन गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे यांनी केले आहे.

आजरा शहर परिसराला झोडपले
आजरा ः आजरा शहर व परिसराला पावसाने चांगलेच झोडपले. आज दुपारी व सायंकाळी शहर व परिसरात धुवाँधार पाऊस कोसळला. शुक्रवारी अनंत चतुर्थी असल्याने आज आजऱ्याचा आठवडी बाजार भरला होता. पावसामुळे बाजारासाठी आलेल्या नागरिकांची त्रेधा उडाली. दुकानांचा आसरा शोधावा लागला. दोन टप्यात मुसळधार पाउस झाला. पावसामुळे भात, भुईमुग, नागली व ऊस पिकांना चांगला दिलासा मिळाला आहे.

हलकर्णीत मटक्यावर कारवाई
गडहिंग्लज : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे कल्याण मटका लिहून घेणाऱ्या रोहित सुरेश माने (मुगळी, ता. गडहिंग्लज) यास पोलिसांनी अटक करून त्याच्याकडील 1820 रुपयांची रोकड आणि मटक्याचे साहित्य जप्त केले. हलकर्णीतील एसटी थांबा चौकातील बोळात रोहित हा मटका लिहून घेत असताना पोलिस नाईक अजित कांबळे यांनी आज दुपारी पावणे एकच्या सुमारास त्याला रंगेहाथ पकडले. श्री. कांबळे यांनी स्वत: फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94482 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..