‘उपजिल्हा’मध्ये सर्जनसह रिक्त पदे तत्काळ भरावीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘उपजिल्हा’मध्ये सर्जनसह रिक्त पदे तत्काळ भरावीत
‘उपजिल्हा’मध्ये सर्जनसह रिक्त पदे तत्काळ भरावीत

‘उपजिल्हा’मध्ये सर्जनसह रिक्त पदे तत्काळ भरावीत

sakal_logo
By

48961
गडहिंग्लज : उपजिल्हा रुग्णालयात सर्जन डॉक्टर नेमणुकीच्या मागणीचे निवेदन जीवन क्षीरसागर यांच्याकडे देताना मनसेचे शिष्टमंडळ.

‘उपजिल्हा’मध्ये सर्जनसह
रिक्त पदे तत्काळ भरावीत
---
मनसेची निवेदन; सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांसह सीमाभागातील सर्वसामान्य रुग्णांसाठी येथील उपजिल्हा रुग्णालय जीवनदायिनी ठरली आहे. परंतु, बऱ्याच कालावधीपासून याठिकाणी सर्जन, एम. डी. डॉक्टरांसह इतर पदे रिक्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. तत्काळ ही पदे भरावीत, अशी मागणी मनसेने केली आहे.
याबाबत जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, शहराध्यक्ष केंपाण्णा कोरी, सूरज सोरटे, रोहित देवार्डे यांच्या शिष्टमंडळाने प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे, की सर्व रोगांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार होतात. शस्त्रक्रियाही मोठ्या प्रमाणात असतात. कोरोना काळात तर शेकडो रुग्ण याठिकाणी बरे होऊन बाहेर पडले. उपचारांसाठी याठिकाणी रोजच रुग्णांच्या रांगा लागतात. प्रसूतीची संख्याही मोठी आहे. सिझर, कुटुंब नियोजनासह विविध रोगांचे ऑपरेशन्सही मोठ्या प्रमाणात होतात. या पार्श्‍वभूमीवर रुग्णालयाकडे एकही कायम सर्जन नाही. मध्यंतरी काही कालावधीसाठी पूर्ण वेळ, तर काही दिवस प्रभारी म्हणून एक सर्जन होते. परंतु, आज येथे सर्जन पूर्णवेळ कार्यान्वित नाही. जबाबदार पदच रिक्त असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. सर्जनसह एम. डी. डॉक्टर आणि विविध विभागांत रिक्त असलेली पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94492 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..